IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये कोणाची पॉवर, पगार जास्त? जाणून घ्या सर्वकाही... Rojgar News

IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये कोणाची पॉवर, पगार जास्त? जाणून घ्या सर्वकाही... Rojgar News

IAS Vs : यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. त्यासाठी उमेदवार अनेक वर्षे मेहनत करुन नंतर परीक्षा देतात. देशसेवेची जबाबदारी घेणारे (IAS Officer) आणि अधिकारीही (IPS Officer) या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले असतात. यूपीएससीमध्ये पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा राऊंड (UPSC Prelims, Main and Interview) घेतला जातो. हे तिन्ही टप्पे पार केल्यानंतर, त्यांच्या श्रेणीनुसार पदे दिली जातात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची आयएएस, आयपीएस, आयईएस किंवा आयएफएससारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. आयएएस आणि आयपीएस एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची स्वतःची प्रतिष्ठा आहे. त्या पदांची पॉवर, प्रशिक्षण आणि पगाराशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊया. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग यूपीएससी परीक्षा आणि मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अॅकेडमी (LBSNAA), मसूरी येथे ३ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान मूलभूत प्रशासकीय कौशल्ये शिकवली जातात. प्रत्येक नागरी सेवा अधिकाऱ्याला याची माहिती असणे आवश्यक आहे. ३ महिन्यांनंतर आयएएस आणि आयपीएसच्या प्रशिक्षणात मोठा बदल होत जातो. यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अॅकेडमी (SVPNPA) येथे पाठवले जाते. येथे त्यांना पोलीस प्रशिक्षण दिले जाते.या प्रशिक्षणात आयपीएस अधिकाऱ्यांना घोडेस्वारी, परेड आणि शस्त्र हाताळणे शिकवले जाते. दुसरीकडे आयएएस अधिकाऱ्यांना मसुरीमध्येच प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. ते पूर्ण केल्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग सुरू होते, ज्यामध्ये प्रशासन, पोलिसिंग आणि प्रशासन या प्रत्येक क्षेत्रातील माहिती दिली जाते. कोणाकडे जास्त पॉवर? आयएएस आणि आयपीएस या दोन्ही पदांच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे वेगळ्या असतात. आयएएस अधिकारी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जातात. तर आयपीएस अधिकारी हे केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जाते. एका प्रदेशात फक्त एकच आयएएस अधिकारी असतो तर एखाद्या प्रदेशात आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार असते. आयएएस अधिकाऱ्याचा पगार आयपीएस अधिकाऱ्यापेक्षा तुलनेने जास्त असतो. एकंदरीत, आयएएस अधिकाऱ्याचे पद वेतन आणि अधिकाराच्या बाबतीत आयपीएस अधिकाऱ्यापेक्षा जास्त आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा पगार आयएएस अधिकाऱ्याचा (IAS Officer) पगार हा आयपीएस अधिकाऱ्यापेक्षा (IPS Officer) जास्त असतो. कारण त्यांच्या जबाबदाऱ्याही जास्त असतात. सातव्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्याचा पगार दरमहा ५६ हजार १०० ते २ लाख ५० हजार रुपये प्रतिमहा असतो. तर आयपीएस अधिकाऱ्याचा पगार दरमहा ५६ हजार १०० ते २ लाख २५ हजार रुपयांपर्यंत असतो. यासोबतच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना पे बँड व्यतिरिक्त इतर सुविधाही दिल्या जातात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ozfgXh
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये कोणाची पॉवर, पगार जास्त? जाणून घ्या सर्वकाही... Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel