IBPS Clerk Exam: इंग्रजी विषयात चांगले गुण मिळविण्यासाठी 'या' टीप्स करा फॉलो Rojgar News

IBPS Clerk Exam: इंग्रजी विषयात चांगले गुण मिळविण्यासाठी 'या' टीप्स करा फॉलो Rojgar News

2021: पुढील आठवड्यापासून क्लर्क २०२१ पूर्व परीक्षा ( Prelims) सुरू होत आहे. आता परीक्षेला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणत्या विभागातील कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आणि नेमका कुठला अभ्यास करायचा याबाबत विद्यार्थ्यांची तयारी सुरु आहे. या परीक्षेतील इंग्रजीच्या पेपरमध्ये चांगले गुण कसे मिळवायचे याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाल देणार आहोत. इंग्रजी भाषेचा पेपर हा आयबीपीएस लिपिक २०२१ प्रिलिम्स (IBPS Clerk 2021 Prelims) परीक्षेतील स्कोअरिंग विषयांपैकी एक आहे. इंग्रजी विषयामध्ये मूलभूत व्याकरण आणि भाषा कौशल्यातून जास्त गुण मिळवू शकता. त्यामुळे आता परीक्षा तोंडावर असताना इंग्रजी भाषेत चांगले गुण कसे मिळवायचे ते जाणून घेऊया. इंग्रजी भाषा हा आयबीपीएस क्लर्क २०२१ पूर्व परीक्षेचा एक महत्त्वाचा विभाग आहे, ज्यासाठी ३० गुण आहेत. यातील प्रश्न सामान्यतः अवघड असले तरी उमेदवारांना भाषेवर चांगली पकड आणि वाचनाची सवय असेल तर आयबीपीएल क्लर्क परीक्षेच्या इंग्रजी विषयात ते चांगले गुण मिळवू शकतात. आयबीपीएस क्लर्क इंग्रजी भाषा विभागातील महत्त्वाच्या विषयांच्या यादीत रीडिंग कॉम्प्रिहेन्शन सर्वात वरचे आहे. तर व्याकरणामध्ये एरर स्पॉटिंग, अॅक्टीव्ह अॅण्ड पॅसिव्ह, म्हणी आणि वाक्यांश, वाक्य, रिअरेंजमेंट, रिकाम्या जागा भरा,समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, क्लोज टेस्ट, रिक्त जागा भरा, शुद्धलेखन सुधारणा इ.चा समावेश आहे. रीडिंग कॉम्प्रिहेंशन सर्वसाधारणपणे न्यूज पेपर, मॅगझिन, बिझनेस संबधित पुस्तके, बॅंकिंग, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी इत्यादींशी संबंधित पुस्तकातून मिळते. आयबीपीएस क्लर्क परीक्षेतील इंग्रजी भाषेत अधिक गुण मिळविण्यासाठी त्यांचा नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. कॉम्प्रिहेंशन म्हणजेच आकलन हा विषय आधारित किंवा निष्कर्ष-आधारित आहे. त्यामुळे रोज किमान २ ते ४ पेपर किमन ३० मिनिटे वाचण्याची सवय लावा. वाचताना सापडलेल्या नवीन शब्दांचा अभ्यास करण्यासाठी शब्दकोश घेऊन बसा. यामुळे तुमचा शब्दसंग्रह मजबूत होईल आणि प्रश्न समजून घेण्यास खूप होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EC1GIa
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "IBPS Clerk Exam: इंग्रजी विषयात चांगले गुण मिळविण्यासाठी 'या' टीप्स करा फॉलो Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel