
CMA 2021: इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट ऑफ इंडिया (Institute of Cost Accountants of India, ICMAI) ने नुकतेच डिसेंबर सत्र सीएमए परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. परीक्षा ८ डिसेंबरला होणार असून, परीक्षेच्या ६ दिवस आधी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट icmai.in वरून जाऊन पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना लॉगिन आयडी भरणे आवश्यक आहे. ICMAI CMA December Admit card: असे करा डाऊनलोड इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट ऑफ इंडिया ICMAI ची अधिकृत वेबसाईट icmai.in वर जा. होमपेजवरील 'Student' पोर्टलवर जा आणि 'Exam' आणि 'Admit Card' लिंकवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी लॉगिन तपशील आणि इतर क्रेडेन्शियल भरा. डिसेंबर परीक्षेसाठी प्रवेशपत्र पहा आणि डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या. ८ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून परीक्षाकेंद्रांवर होणार आहेत. संस्थेने उमेदवारांना निवड रद्द करण्याचा पर्यायही दिला होता. या परीक्षा ८ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत सुरु राहतील. परीक्षा दिलेल्या तारखेला तीन तासांच्या दोन शिफ्टमध्ये घेतल्या जातील. या परीक्षा सकाळी १० आणि दुपारी २ वाजता सुरू होतील. तसेच ICMAI ने सीएए फाउंडेशन डिसेंबर २०२१ ची परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे. बरेच दिवस उमेदवार प्रवेशपत्राची वाट पाहत होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ICMA तर्फे सीएमए परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल प्रतिक्रीया देत होते. सीएमए परीक्षेला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवेशपत्रावर दिलेली माहिती नीट वाचण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये काही चूक झाल्यास ते दुरुस्त करू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3G6UtQz
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या