Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-12-23T15:00:14Z
Rojgar

ICSE दहावी-बारावी बोर्ड परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम, सॅम्पल पेपर 'येथे' करा डाऊनलोड

Advertisement
ICSE 2022: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. यानुसार यावेळची बोर्ड परीक्षा ही कमी केलेल्या अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे. ICSE ने बोर्ड परीक्षा २०२२ साठी नवीन अभ्यासक्रम (ICSE Board Syllabus 2022) जाहीर केला आहे. यासोबतच दोन्ही इयत्तांसाठी नमुना प्रश्नपत्रिका (ICSE Sample Paper 2022) देखील प्रसिद्ध करण्यात आली असून आयसीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cisce.org वर अपलोड करण्यात आली आहेत. आयसीएसई बोर्ड परीक्षा २०२२ देणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचा अभ्यासक्रम आणि नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी ICSE वेबसाइटवर जावे लागेल. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांना ICSE परीक्षा अभ्यासक्रम ( reduced syllabus 2022) आणि नमुना पेपर मिळवू शकते. ICSE Board Exam pattern 2022: जाणून घ्या कमी केलेला अभ्यासक्रम आणि बोर्डाने जाहीर केलेल्या नमुना पेपरच्या आधारे, विद्यार्थ्यांना आयसीएसई बोर्ड परीक्षा पेपर पॅटर्न २०२२ ( paper pattern) मिळू शकतो. आयसीएसई बोर्डाच्या थ्येअरी परीक्षा ८०-८० गुणांसाठी होत आहेत. उर्वरित २० गुण प्रोजेक्ट / अंतर्गत मूल्यांकन / प्रात्यक्षिक परीक्षांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, ICSE इयत्ता दहाची बोर्ड गणित परीक्षा पॅटर्न २०२२ मध्ये एकूण दोन भाग असतील. पेपर १ मध्ये ८० गुणांचा थ्येअरी भाग आणि २० गुणांचा प्रोजेक्ट असेल. पेपर १ मध्ये तीन विभाग असतील. हा विभाग एकूण ६५ गुणांचा असून तो अनिवार्य असेल. तसेच विभाग बी आणि सी मधून पर्याय निवडण्याची संधी असेल. दोन्ही विभाग प्रत्येकी १५ गुणांचे असतील. विद्यार्थ्यांना यातील एकाचे उत्तर लिहावे लागेल.


source https://maharashtratimes.com/career/career-news/icse-board-exam-2022-new-syllabus-for-icse-class-10-12-board-exam-released-download-sample-paper/articleshow/88454115.cms