Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-12-09T07:43:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOU Admission 2021: यूजी, पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ Rojgar News

Advertisement
Admission 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जुलै २०२१ सत्रासाठी अंडर ग्रॅज्युएट (UG) च्या ऑनलाइन प्रवेशाची () तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रवेशासाठी उमेदवारांना १२ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन प्रवेश पोर्टल gnouadmission.samarth.edu.in द्वारे ओडीएल प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात. यापूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) ही मुदत ७ डिसेंबरपर्यंत वाढवली होती. अर्जाची अंतिम तारीख या वर्षी अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी, नवीन अर्जदाराला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि सर्व तपशील भरावा लागेल. आवडीचा अभ्यासक्रम निवडावा लागेल. इग्रूतर्फे विविध विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, बॅचलर डिग्री, पीजी डिप्लोमा, पीजी प्रमाणपत्र आणि सर्टिफिकेट कोर्स शिकविले जातात. इग्नू यूजी किंवा पीजी प्रवेशासाठी अर्जामध्ये काही शंका असल्यास तुम्ही इग्नू हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही इग्नूच्या ssc@ignou.ac.in या ईमेल आयडीवर मेल करू शकता. किंवा ०११-२९५७२५१३, ०११-२९५७२५१४ हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता. असा करा अर्ज इग्नू प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जावे लागेल. येथे अर्जाचे शुल्कही ऑनलाइन भरावे लागणार आहे. फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला इग्नू प्रवेश पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर लॉगिन आयडीच्या मदतीने लॉगिन करून फॉर्म भरा. मागितलेली माहिती आणि शुल्क भरा. नोंदणीनंतर प्रिंट आउट घ्या. विविध अभ्यासक्रम २०२१-२२ च्या सुरु असलेल्या सत्रापासून, विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ज्योतिष शास्त्रापासून ते सांस्कृतिक अभ्यासापर्यंत आणि उर्दू शिकण्यापासून ते संस्कृत भाषेपर्यंत अनेक कोर्स यंदा सुरू करण्यात आले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DCMKrS
Source https://ift.tt/310mqee