Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-12-22T10:00:32Z
Rojgar

IGNOU Exam Form 2021: इग्नूतर्फे डिसेंबर टीईई संदर्भात महत्वाची सूचना

Advertisement
Form 2021: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) ने डिसेंबर टर्म एंड एक्झाम (TEE) फॉर्मची शेवटची तारीख तिसऱ्यांदा वाढविली आहे. आता विद्यार्थी विलंब शुल्काशिवाय २३ डिसेंबर २०२१ पर्यंत परीक्षेचा फॉर्म भरु शकतात. तसेच २४ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत, विद्यार्थी विलंब शुल्कासह ११०० रुपये भरून टर्म एंड परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. प्रति कोर्स फी या रकमेत समाविष्ट नाही. ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्यासोबत २०० रुपये प्रति कोर्स देखील जमा करावे लागतील. यापूर्वी विलंब शुल्काशिवाय परीक्षा फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख १९ डिसेंबर २०२१ होती. त्यापूर्वी ती १५ डिसेंबर २०२१ होती. इग्नू २०२१ परीक्षेसाठी अर्ज करण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. अशी करा नोंदणी (term-end examination form) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, (IGNOU) च्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा. होमपेजवरील 'Alert' सेक्शनमध्ये जा. 'डिसेंबर २०२१ साठी टर्म-एंड परीक्षा फॉर्म सबमिशन लिंक' वर क्लिक करा. नवीन विंडो उघडल्यावर, 'परीक्षा फॉर्म भरण्यासाठी पुढे जा' या लिंकवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी प्रोग्राम कोड, नावनोंदणी क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे ठिकाण भरा. आवश्यक माहिती, कागदपत्रे सबमिट करा आणि अर्ज शुल्क भरा. 'सबमिट' वर क्लिक करा आणि भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट घ्या विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे असेलेले परीक्षाकेंद्रावर निवडता येणार आहे. तसेच गरज भासल्यास विद्यापीठाकडून परीक्षा केंद्र बदलून घेता येणार आहे. ही परीक्षा २० जानेवारी २०२२ ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ऑफलाइन माध्यमातून घेतली जाणार आहे. प्रवेशपत्र परीक्षेच्या काही दिवस आधी प्रवेशपत्र जाहीर केले जातील. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी परीक्षा फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा. सर्व माहिती योग्य रितीने भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ignou-exam-form-2021-ignou-extends-exam-form-filling-date-see-details-to-avoid-late-fee/articleshow/88427533.cms