
Course: इग्नूतर्फे जूलै २०२१ सत्राला प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इग्नुतर्फे यूजी आणि पीजी अभ्यासक्रमाच्या अर्ज प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या मुदतवाढीनुसार उमेदवारांना अधिकृत वेबसाइट gnou.ac.in वर जाऊन ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार होता. नव्या अपडेटनुसार उमेदवारांना १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्रूच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. डिप्लोमा/पदव्युत्तर डिप्लोमाचे प्रवेश बंद झाले आहेत. त्यासाठी ही मुदतवाढ नसणार आहे. केवळ यूजी आणि पीजी कोर्सेसच्या अर्ज प्रक्रियेलाच मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती इग्नूतर्फे देण्यात आली आहे. त्यानुसार यूजी आणि पीजी कोर्सच्या प्रवेशासाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्नूने यावर्षी अनेकवेळा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. असा करा अर्ज अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ignou.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सर्वप्रथम येथे नोंदणी करा. नोंदणी झाली असेल तर क्रेडेन्शियल्स टाकून लॉगिन करा. अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा. आता अर्ज भरा. फी जमा करा आणि मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा. शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा. महत्वाची माहिती ओडीएल प्रोग्राममध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट ignouadmissions.samarth.edu.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ignouiop.samarth.edu.in ला भेट द्यावी लागेल. नव्या उमेदवारांसाठी नव्याने नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करताना उमेदवारांनी आपला अभ्यासक्रम स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे. नोंदणीच्या वेळी आकारले जाणारे शुल्क म्हणजेच नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही. तुम्ही प्रवेश घ्या किंवा न घ्या, ही फी परत केली जाणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी कोर्सची योग्य माहिती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d9aJEv
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या