IGNOU तर्फे यूजी, पीजी कोर्सेच्या प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ

IGNOU तर्फे यूजी, पीजी कोर्सेच्या प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ

IGNOU Course: इग्नूतर्फे जूलै २०२१ सत्राला प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इग्नुतर्फे यूजी आणि पीजी अभ्यासक्रमाच्या अर्ज प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या मुदतवाढीनुसार उमेदवारांना अधिकृत वेबसाइट gnou.ac.in वर जाऊन १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार होता. नव्या अपडेटनुसार उमेदवारांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्रूच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, टर्म एंड एक्झामिनेशन (TEE) साठी प्रोजेक्ट, प्रबंध, फील्डवर्क जर्नल, इंटर्नशिप अहवाल ऑनलाइन सबमिट करण्याची अंतिम मुदत देखील वाढवण्यात आली. विद्यार्थ्यांना आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांची असाइनमेंट सबमिट करता येणार आहे. दरम्यान, विद्यापीठाने टीईई डिसेंबर 2021 (TEE December 2021) साठी तात्पुरत्या परीक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, परीक्षा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. सकाळची शिफ्ट सकाळी १० वाजता सुरू होईल आणि दुपारी १ वाजेपर्यंत संपेल तर दुपारची शिफ्ट दुपारी २ ते ५ दरम्यान असेल. डिप्लोमा/पदव्युत्तर डिप्लोमाचे प्रवेश बंद झाले आहेत. त्यासाठी ही मुदतवाढ नसणार आहे. केवळ यूजी आणि पीजी कोर्सेसच्या अर्ज प्रक्रियेलाच मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती इग्नूतर्फे देण्यात आली आहे. त्यानुसार यूजी आणि पीजी कोर्सच्या प्रवेशासाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्नूने यावर्षी अनेकवेळा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. असा करा अर्ज अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ignou.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सर्वप्रथम येथे नोंदणी करा. नोंदणी झाली असेल तर क्रेडेन्शियल्स टाकून लॉगिन करा. अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा. आता अर्ज भरा. फी जमा करा आणि मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा. शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा. महत्वाची माहिती ओडीएल प्रोग्राममध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट ignouadmissions.samarth.edu.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ignouiop.samarth.edu.in ला भेट द्यावी लागेल. नव्या उमेदवारांसाठी नव्याने नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करताना उमेदवारांनी आपला अभ्यासक्रम स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे. नोंदणीच्या वेळी आकारले जाणारे शुल्क म्हणजेच नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही. तुम्ही प्रवेश घ्या किंवा न घ्या, ही फी परत केली जाणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी कोर्सची योग्य माहिती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ignou-admission-2021-admission-date-extended-once-again-in-ug-pg-courses-know-last-date/articleshow/88334282.cms

0 Response to "IGNOU तर्फे यूजी, पीजी कोर्सेच्या प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel