TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IIT च्या प्राध्यापकांनी सांगितले Twitter CEO पराग अग्रवालच्या यशाचे रहस्य Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पराग अग्रवाल हा खूप हुशार आणि नियोजनबद्ध अभ्यास करणारा विद्यार्थी होता. या पद्धतीमुळेच त्याला हे यश मिळाल्याचे पराग यांना कम्प्युटर सायन्सचे शिक्षण देणारे आयआयटी मुंबईचे ( Bombay) प्राध्यापक सुप्रतिम बिश्वास यांनी मंगळवारी सांगितले. आयआयटी मुंबईचे विद्यार्थी पराग अग्रवाल यांची नुकतीच ट्विटरच्या सीईओपदी () नियुक्ती झाली. त्यानंतर मंगळवारी आयआयटीमधील प्राध्यापकांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. पराग यांनी २००१मध्ये आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला आणि २००५ मध्ये ते कॉम्प्युटर सायन्स विभागातून रौप्य पदक घेऊन उत्तीर्ण झाल्याचेही बिश्वास यांनी सांगितले. सुरुवातीपासून पराग विभागातील टॉपर विद्यार्थी होता. तरुण वयातील हे यश नियोजनबद्ध अभ्यासाचे फलित आहे. त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना २०१९मध्ये यंग 'अलुमनी अचिव्हर पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते, असेही ते म्हणाले. हा पुरस्कार स्वीकारताना पराग यांनी हॉस्टेल ४च्या मागे बिहार तलावावर मित्रांसोबत घालवेला वेळ, मित्रांसोबत इंटरनेट शेअर करण्याच्या आठवणी जाग्या केल्या होत्या. आपल्या माजी विद्यार्थ्याने मोठे यश मिळवणे हे कोणत्याही शिक्षणसंस्थेसाठी गौरवास्पद असते. याचप्रमाणे परागचा आम्हाला अभिमान आहे, असे मत आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. सुभाशीष चौधरी यांनी व्यक्त केले. 'आयआयटीमध्ये परागला मिळालेले शिक्षण आणि प्रोत्साहन त्याला खूप उपयुक्त ठरले. कठोर परिश्रमाच्या आधारे परागने हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन आणि येत्या काळात आयआयटी मुंबई अशा प्रकारे आणखी यशवंत देईल', असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o8tYUM
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या