Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १२ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-12-12T14:28:30Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerIndia Post RecruitmentResults

India Post Recruitment 2021: भारतीय पोस्टमध्ये १२वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; पगार ८१ हजारापर्यंत!

Advertisement

India Post Recruitment 2021: इंडिया पोस्टने जम्मू आणि काश्मीर पोस्टल सर्कलमध्ये स्पोर्ट्स कोटा अंतर्गत पोस्टल सहाय्यकांच्या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार जम्मू आणि काश्मीर पोस्टल सर्कल भरती २०२१ साठी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात २० डिसेंबर २०२१ पर्यंत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात.

google news


किती पदांची होणार भरती?

या प्रक्रियेद्वारे, जम्मू आणि काश्मीर पोस्टल सर्कलमध्ये पोस्टल असिस्टंटच्या एकूण ५ पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये उधमपूर विभागातील १ पद, राजौरी विभागातील १ पद, जम्मू विभागातील २ आणि श्रीनगर विभागातील १ पदाचा समावेश आहे. पोस्टल असिस्टंटच्या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल ४ अंतर्गत २५५०० रुपये ते ८११०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

( हे ही वाचा: BECIL Recruitment 2021: विविध पदांसाठी भरती; नोकरीची सुवर्ण संधी! जाणून घ्या संपूर्ण तपशील )

पात्रता किती?

अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय दहावीमध्ये हिंदी/उर्दू विषयाचा अभ्यास करावा. या पदांसाठी भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे आणि SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे वयाची सूट असेल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

( हे ही वाचा: Indian Air Force Recruitment 2021: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील )

कसा करायचा अर्ज?

सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार जम्मू आणि काश्मीर पोस्टल सर्कल भरती २०२१ साठी विहित नमुन्यात आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह नोंदणीकृत पोस्ट किंवा स्पीड पोस्टद्वारे सहायक संचालक, मुख्य पोस्टमास्टर जनरल, जम्मू आणि काश्मीर सर्कल, मेघदूत भवन, रेलहेड कॉम्प्लेक्स, जम्मू- १८००१२ यावर अर्ज करू शकतात. अर्ज २० डिसेंबर २०२१ पर्यंत करावे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइट तपासा.

( हे ही वाचा: Central Bank SO Recruitment 2021: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती, पगार एक लाखांपर्यंत )

याशिवाय, इंडिया पोस्टने बिहार सर्कलमधील विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या प्रक्रियेद्वारे एकूण ६० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पोस्टल असिस्टंटच्या ३१ पदे, सॉर्टिंग असिस्टंटच्या ११ पदे, पोस्टमनच्या ५ पदे आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या १३ पदांचा समावेश आहे. सर्व पात्र उमेदवार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात.

The post India Post Recruitment 2021: भारतीय पोस्टमध्ये १२वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; पगार ८१ हजारापर्यंत! appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..!