Interview मध्ये विचारतात 'हे' प्रश्न, उत्तरे आधीच माहिती करुन घ्या आणि हमखास नोकरी मिळवा Rojgar News

Interview मध्ये विचारतात 'हे' प्रश्न, उत्तरे आधीच माहिती करुन घ्या आणि हमखास नोकरी मिळवा Rojgar News

Interview Tips: मुलाखत या शब्दानेच अनेकांना भीती वाटते. तुम्ही फ्रेशर असाल तर भीती वाटणे साहजिकच आहे. तरुण मंडळी मुलाखत देण्यासाठी बरेच दिवस आधी तयारी करतात. प्रश्नांचा विचार करण्यात, मुलाखतीत काय विचारले जाईल, आपण कसे उत्तर देऊ? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात घोळत राहतात. पण प्रत्यक्ष मुलाखतीत असे काही कॉमन प्रश्न विचारले जातात, ज्याचे उत्तर अगदी सोपे असते. फक्त त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आत्मविश्वासाने द्यायचे असते. आम्ही तुम्हाला मुलाखतीत विचारले जाणारे काही प्रश्न सांगणार आहोत. त्याची तयारी करून तुम्ही तुमची नोकरी पक्की करु शकता. तसेच मुलाखत घेणाऱ्यावर चांगले इम्प्रेशन देखील पाडू शकता. तुमचा परिचय द्याकोणत्याही मुलाखतीच्या सुरुवातीला विचारला जाणारा हा सर्वसामान्य प्रश्न आहे. याद्वारे तुमच्या सीव्हीमध्ये नसलेले स्वतःबद्दल आणखी काय सांगू शकता हे एचआरला समजून घ्यायचे असते. अशावेळी न डगमगता तुम्ही समोरच्या कंपनीच्या कामाला अनुसरुन याआधी केलेल्या कामांबद्दल नेमक्या शब्दात सांगायला हवे. यामध्ये मुद्देसुद बोलणे महत्वाचे असते. अशावेळी तुम्ही कधीच न केलेल्या कामांबद्दल बोलणे टाळावे. तसेच स्वत:बद्दलच बोलावे. तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणे टाळावे. तुम्ही हे क्षेत्र का निवडले? फ्रेशर्सच्या मुलाखती घेत असताना, एचआरच्या यादीत नक्कीच प्रश्न असतो की तुम्ही हे करिअर का निवडले? यावरून तुम्हाला या क्षेत्रात खरोखरच रस आहे की नाही? हे त्यांना समजून घ्यायचे असते. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्यानुसार देऊ शकता. पण हे क्षेत्र निवडण्यामागचे आपले नेमके उद्दीष्ट्य, आपण या क्षेत्रात केलेले काम आणि भविष्यात करु इच्छणारे काम याचा थोडक्यात आढावा देऊ शकता. यासाठी तुमच्या क्षेत्रात सध्या काय घडामोडी घडताहेत यावर तुमचं लक्ष असणं गरजेचे आहे. कारण पुढील प्रश्न त्यासंदर्भात असू शकतो. तुमचा आवडता छंद कोणता? तुमचा छंद काय आहे? हा प्रश्न एचआर अनेकदा फ्रेशर्सना विचारतात. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर आधीच माहित असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने अचूक उत्तर देऊ शकता. हा एक अतिशय सोपा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर देऊन तुम्ही मुलाखतकाराला प्रभावित करू शकता. तुम्हाला पुस्तके वाचायला आवडत असतील तर सध्या कोणतं पुस्तकं वाचताय? कोणता लेखक आवडतो आणि का आवडतो? या प्रश्नांची तयारी देखील करुन जायला हवे. या कंपनीसाठी तुम्ही नवीन काय करू शकता? एचआयर एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवर घेताना तुम्ही कंपनीसाठी कोणत्या नवीन गोष्टी करू शकता हे नक्कीच विचारते. त्या कंपनीच्या वाढीमध्ये तुमचे योगदान काय असेल, हे प्रश्न बहुतांशी विचारले जातात. तुम्ही तुमच्यानुसार हा प्रश्न तयार करू शकता. मुलाखत देण्याआधी आपल्याला कंपनीबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. कंपनीच्या कामाचे स्वरुप, मार्केटमधील स्थिती याची माहिती तुम्हाला गुगल किंवा अनुभवी व्यक्तींकडून मिळवता येऊ शकेल. तुमचा ड्रीम जॉब काय? जेव्हा एचआर फ्रेशर्सची मुलाखत घेतात तेव्हा ड्रीम जॉबबद्दलचा प्रश्न नक्कीच विचारतात. यावरून उमेदवार काम करण्यास किती इच्छुक आहेत हे त्यांना कळू शकते. याचे उत्तर अतिशय काळजीपूर्वक द्या. तुम्ही जे सांगाल त्याला अनुसरुन एचआर पुढील प्रश्न विचारणार आहे हे लक्षात असू द्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30bQEdB
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "Interview मध्ये विचारतात 'हे' प्रश्न, उत्तरे आधीच माहिती करुन घ्या आणि हमखास नोकरी मिळवा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel