TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Maharashtra TET 2021: शिक्षक पात्रता परिषदेची उत्तरतालिका जाहीर Rojgar News

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची (Maharashtra Teacher Eligibility Test or Maharashtra ) उत्तरतालिका जाहीर झाली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते या अधिकृत संकेतस्थळावर ही उत्तरतालिका पाहू शकतात. ही प्रोव्हिजनल आन्सर की आहे. उमेदवारांना या उत्तरतालिकेवर काही हरकत नोंदवायची असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ डिसेंबर २०२१ आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल. महाराष्ट्र टीईटी पेपर १ आणि २ ची परीक्षा (Maharashtra TET Paper I and Paper II) २१ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. पेपर १, पेपर २ म्हणजेच गणित आणि सोशल सायन्सची तात्पुरती उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या तारखा आणि उत्तरतालिका डाऊनलोड करण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप जाणून घ्या... महाराष्ट्र टीईटी आन्सर की जाहीर होण्याची तारीख - २ डिसेंबर २०२१ महाराष्ट्र टीईटी आन्सर की वर हरकती नोंदवण्याची तारीख - ८ डिसेंबर २०२१ Maharashtra TET 2021 Answer Key पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा डाऊनलोड - - सर्वात आधी mahatet.in या टीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. - आता 'Interim Answer Key' या पर्यायावर क्लिक करा. - आता एक नवी विंडो उघडेल. - उमेदवारांना पेपर १ इंटरिम आन्सर की किंवा पेपर २ मॅथ्स सायन्स इंटरिम आन्सर की किंवा पेपर २ सोशल सायन्स अंतरिम आन्सर की असे पर्याय दिसतील. - नवी पीडीएफ फाइल उघडेल. - आता उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल. उमेदवार येत्या ८ डिसेंबर २०२१ पर्यंत या आन्सर की वर हरकत नोंदवू शकतात. कोणतीही तक्रार किंवा माहितीसाठी उमेदवारांनी mahatet2021.msce@gmail.com वर संपर्क साधावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oji0YF
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या