Mhada Recruitment 2021: म्हाडा भरतीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल Rojgar News

Mhada Recruitment 2021: म्हाडा भरतीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल Rojgar News

Mhada Recruitment 2021: म्हाडा भरतीच्या परीक्षेची (Mhada Recruitment Exam) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. म्हाडातर्फे याआधी देण्यात आलेल्या सुचनेनुसार ही परीक्षा ५ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी होणार होती. पण आता म्हाडातर्फे या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा देखील एकाच दिवशी येत असल्याने म्हाडाने आपल्या परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे. म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर याचा तपशील पाहता येणार आहे. म्हाडामध्ये विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या अंतर्गत भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या रिक्त जागांसाठी परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा ५ डिसेंबर आणि १२ डिसेंबरला सकाळच्या सत्रात होणार होती. दरम्यान एमपीएससीची परीक्षा ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाने आपले सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार म्हाडाची परीक्षा ५ डिसेंबरला होणार नसून १२, १५ आणि १९ डिसेंबरला दोन्ही सत्रामध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक १२ डिसेंबर २०२१ (सकाळचे सत्र) - कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहाय्यक विधी सल्लागार पद १२ डिसेंबर २०२१ (दुपारचे सत्र) - कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पद १५ डिसेंबर २०२१ (दुपारचे सत्र)- कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक पद १९ डिसेंबर २०२१ (सकाळचे सत्र) - लघुटंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूमापक, अनुरेखक पद १९ डिसेंबर २०२१ (दुपारचे सत्र)- सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक टंकलेखक परीक्षा पॅटर्न शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन ७ क्लस्टर्स बनविण्यात आले आहेत. एका क्लस्टरसाठी एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता या तीन संवर्गांचा समावेश एका क्लस्टरमध्ये करण्यात आला आहे. एक किंवा एकापेक्षा अधिक संवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. रिक्त जागांचा तपशील कार्यकारी अभियंता (स्थापत्य)च्या १३ जागा, उप अभियंता (स्थापत्य)च्या १२ जागा, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारीच्या दोन जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य)च्या ३० जागा, सहायक विधी सल्लागारच्या २ जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)च्या ११९ जागा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायकच्या ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या ४४ जागा, सहाय्यकच्या १८ जागा, वरिष्ठ लिपिकच्या ७३ जागा, कनिष्ठ लिपिक-टंकलेखकच्या २०७ जागा, लघुटंकलेखकच्या २० जागा, भूमापकच्या ११ जागा आणि अनुरेखक पदाच्या ७ जागा रिक्त आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lUBXn9
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "Mhada Recruitment 2021: म्हाडा भरतीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel