TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Ministry of Defence Recruitment 2021: या पदांच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी, १०वी पास ते पदव्युत्तर पदवीधारक करू शकतात अर्ज

डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट (DGDE) किंवा डिफेन्स इस्टेट ऑर्गनायझेशन, संरक्षण मंत्रालयाने कनिष्ठ हिंदी अनुवादक, उपविभागीय अधिकारी आणि हिंदी टंकलेखक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून DGDE Recruitment 2021 साठी अर्ज डाउनलोड करू शकतात आणि १५ जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विहित पत्त्यावर पाठवू शकतात.

रिक्तपदे व वेतन

या प्रक्रियेद्वारे कनिष्ठ हिंदी अनुवादकाच्या ७ पदांसह, उपविभागीय अधिकारी श्रेणी-२ ची ८९ पदे आणि हिंदी टंकलेखकाच्या १ पदांसह एकूण ९७ रिक्त पदांची भरती केली जाईल. कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ९,३०० रुपये ते ३४,८०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. तर, इतर पदांसाठी, उमेदवारांना ५,२०० रुपये ते २०,२०० रुपये प्रति महिना पगार मिळेल. वेतनाव्यतिरिक्त, उमेदवारांना ग्रेड पे देखील मिळेल.

शैक्षणिक पात्रता

अधिकृत अधिसूचनेनुसार कनिष्ठ हिंदी अनुवादक पदाच्या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तर उपविभागीय अधिकारी पदासाठी उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा. तसेच सर्वेक्षण किंवा ड्राफ्ट्समॅनशिपमध्ये किमान २ वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हिंदी टायपिस्टच्या पदासाठी १०वी उत्तीर्ण व्यतिरिक्त हिंदी टाइप लेखनात २५ शब्द प्रतिमिनिट असा वेग असावा.

वयोमर्यादा

कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी, उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. त्याच वेळी, इतर पदांसाठी वयोमर्यादा १८ वर्षांवरून २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

निवड प्रक्रिया

लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व इच्छुक उमेदवार DGDE Ministry of Defence Recruitment 2021साठी त्यांचे अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रे १५ जानेवारी २०२२ पर्यंत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइट तपासा.

The post Ministry of Defence Recruitment 2021: या पदांच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी, १०वी पास ते पदव्युत्तर पदवीधारक करू शकतात अर्ज appeared first on Loksatta.from करिअर वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/3on82FN
Source https://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या