MPSC Admit Card 2021: राज्य सेवा आयोग प्राथमिक परीक्षा २०२१ प्रवेशपत्र जारी; या लिंकवरून असं डाउनलोड करा

MPSC Admit Card 2021: राज्य सेवा आयोग प्राथमिक परीक्षा २०२१ प्रवेशपत्र जारी; या लिंकवरून असं डाउनलोड करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा परीक्षा २०२१ साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी स्वतःची नोंदणी केली आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही राज्य सेवा प्राथमिक परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली आहे. एकूण १०० गुणांसाठी परीक्षा घेतली जाईल. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसण्याची संधी दिली जाईल.

असं करा प्रवेशपत्र डाउनलोड

  • सर्वप्रथम उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर यावं.
  • मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ प्रवेशपत्राशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर स्क्रीनवर लॉगिन पेज दिसेल.
  • विनंती केलेली सर्व माहिती भरून लॉग इन करा.
  • आता तुमचे प्रवेशपत्र तुमच्या समोर दिसेल.
  • तपासा आणि डाउनलोड करा.

प्रवेशपत्र हे महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी त्यांच्यासोबत वैध ओळखपत्रही आणावे. उमेदवारांचे नाव, अनुक्रमांक, केंद्र, परीक्षेची वेळ आणि परीक्षेशी संबंधित इतर माहिती आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रवेशपत्रावर दिली आहेत. उमेदवारांनी परीक्षेदरम्यान त्यांचे पालन करावे. अधिकृत वेबसाइटवर शेवटच्या क्षणी ओव्हरलोडिंग होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर डाउनलोड करा.

एमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्वपरीक्षा राज्यव्यवस्था अभ्यासक्रम आणि प्रश्न विश्लेषण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) एकूण २९० रिक्त पदांची भरती करण्यासाठी ही राज्य सेवा प्राथमिक परीक्षा २०२१ आयोजित केली आहे. उत्तीर्ण उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, एसपी, राज्य कराचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक व्यवस्थापक इत्यादी पदांवर नियुक्ती दिली जाईल.

The post MPSC Admit Card 2021: राज्य सेवा आयोग प्राथमिक परीक्षा २०२१ प्रवेशपत्र जारी; या लिंकवरून असं डाउनलोड करा appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: MPSC Admit Card 2021: राज्य सेवा आयोग प्राथमिक परीक्षा २०२१ प्रवेशपत्र जारी; या लिंकवरून असं डाउनलोड कराhttps://ift.tt/3dmx3ZV

0 Response to "MPSC Admit Card 2021: राज्य सेवा आयोग प्राथमिक परीक्षा २०२१ प्रवेशपत्र जारी; या लिंकवरून असं डाउनलोड करा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel