MPSC Exam : एमपीएससीचा धडाका सुरुच, 900 पदांसाठी संयुक्त गट क पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, राज्यसेवेचं हॉल तिकीट जाहीर Rojgar News

MPSC Exam : एमपीएससीचा धडाका सुरुच, 900 पदांसाठी संयुक्त गट क पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, राज्यसेवेचं हॉल तिकीट जाहीर Rojgar News

MPSC

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध विभागातील गट कच्या पदासांठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पदांचा तपशील

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021

उद्योग निरीक्षक :- 103 पदे

दुय्यम निरीक्षक :- 114 पदे

तांत्रिक सहाय्यक :- 14 पदे

कर सहाय्यक :- 117 पदे

लिपिक टंकलेखक :- मराठी :- 473 पदे आणि इंग्रजी :- 79 पदे.

शैक्षणिक पात्रता

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी आणि पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका/पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क आणि अर्ज करण्याची मुदत

खुल्या प्रवर्गातील उमदेवारांना 394 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवासांठी 294 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तर, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 11 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी प्रमाणपत्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहेत. उमेदवारांना त्यांच्या खात्यात ऑनलाईन अर्ज प्रणालीवर प्रवेशपत्र उपलब्ध होतील.

वर्क फ्रॉम होम’ संपणार; कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात पुन्हा ‘ऑफिस चले हम’!

MPSC Update: औषध निरीक्षक पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, आयोगाकडून महत्त्वाची माहिती

MPSC declared Combined Group C exam notification for 900 post and admit card for state service pre exam which held in January 2022


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: MPSC Exam : एमपीएससीचा धडाका सुरुच, 900 पदांसाठी संयुक्त गट क पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, राज्यसेवेचं हॉल तिकीट जाहीरhttps://ift.tt/321G0a8

0 Response to "MPSC Exam : एमपीएससीचा धडाका सुरुच, 900 पदांसाठी संयुक्त गट क पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, राज्यसेवेचं हॉल तिकीट जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel