TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MPSC Exam Datesheet 2022: एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर Rojgar News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission, ) पुढील वर्षी २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक () जाहीर केले आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व, मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निकाल कधी अपेक्षित आहे तो अंदाजित महिना देखील आयोगाच्या या वार्षिक कॅलेंडरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या वेळापत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी तर मुख्य परीक्षा ७ ते ९ मे २०२२ या कालावधीत होईल. शनिवारी एमपीएससी प्रशासनाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जे उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील वर्षीच्या परीक्षांच्या तारखा पाहता येतील. या तारखा पुढीलप्रमाणे आहेत - राज्यसेवा परीक्षा २०२१ पूर्व परीक्षा : दिनांक २ जानेवारी २०२२ मुख्य परीक्षा : ७ ते ९ मे २०२२ दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१ पूर्व परीक्षा :१२ मार्च २०२२ मुख्य परीक्षा : २ जुलै २०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२ मुख्य परीक्षा : ९ जुलै ते ३१ जुलै २०२२ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ पूर्व परीक्षा : ३ एप्रिल २०२२ मुख्य परीक्षा : ६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२ महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२ मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१ पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२ मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२ राज्यसेवा परीक्षा २०२२ पूर्व परीक्षा : १९ जून २०२२ मुख्य परीक्षा : १५ ते १७ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२ मुख्य परीक्षा :२४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२ मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३ महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान होणार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२ पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२ मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ruZqPg
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या