MPSC Mains 2021: राज्य लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा शनिवारपासून Rojgar News

MPSC Mains 2021: राज्य लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा शनिवारपासून Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षेचे चार डिसेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. सहा डिसेंबरपर्यंत परीक्षा केंद्रावर विषयांकीत परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परीक्षा चार डिसेंबरला सकाळी नऊ ते १२ व दुपारी चार ते सायंकाळी पाच वाजता होणार आहे. पाच व सहा डिसेंबर रोजी कालावधीमध्ये सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. एक उपकेंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी एकूण ३३९ उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला आहे. परीक्षेसाठी ५६ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष परीक्षेच्या कालावधीत उमेदवार यांच्या बैठक क्रमांकानुसार दिलेल्या ए, बी, सी, डी वर्णक्षरांच्या संचापैकी त्याला दिलेल्या वर्णाक्षरांच्या प्रश्नपुस्तिकेचा संच वापरत आहे याची पर्यवेक्षक व समवेक्षकांनी सातत्याने खात्री करावी. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळया व निळया शाईचे बॉल पॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायाकिंत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणेतही सहित्य अथवा वस्तू परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी नाही. उमेदवारास त्याच्यासोबत डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेराफोन असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाता येणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dcUaHL
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "MPSC Mains 2021: राज्य लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा शनिवारपासून Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel