
MSBTE डिप्लोमा परीक्षा ऑनलाइन स्वरूपात Rojgar News
बुधवार, ८ डिसेंबर, २०२१
Comment

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) इंजिनीअरिंग व फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा (सत्र परीक्षा) ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा बहुपर्यायी स्वरूपात (MCQ) घेतल्या जाणार असून १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान परीक्षा होणार असल्याचे 'एमएसबीटीई'कडून जाहीर करण्यात आले आहे. लेखी परीक्षांपूर्वी घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षाही ऑनलाइन पद्धतीनेच ३ ते १५ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहेत. परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार इंजिनीअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. वेळापत्रकातील मार्गदर्शक सूचनांनुसार हिवाळी परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही ठिकाणावरून ही परीक्षा देता येणार आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांना ४० प्रश्न विचारले जातील. त्यापैकी ३५ प्रश्न सोडवणे बंधनकारक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्थास्तरावर घेण्यात यावी. यासाठी विविध प्रकारच्या अॅप्लिकेशनचा वापर करावा, अशा सूचना एमएसबीटीईकडून देण्यात आल्या आहेत. टेलिफोनिक पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा संस्थास्तरावर घेण्याची मुभाही देण्यात आली आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांचीच राहणार असल्याचे डॉ. चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे. 'नॉन एआयसीटीई' अभ्यासक्रमांच्या परीक्षांना विलंब अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांचे विद्यार्थी प्रवेश, नोंदणी प्रक्रिया आणि हिवाळी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने या परीक्षांना विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा कालावधी अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षा जाहीर केल्या जातील, असे 'एमएसबीटीई'कडून सांगण्यात आले आहे. हिवाळी परीक्षेचे वेळापत्रक... पहिले आणि तिसरे सत्र वगळून नियमित विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा - तीन ते १५ जानेवारी २०२२ ऑनलाइन लेखी परीक्षा - १८ जानेवारी ते नऊ फेब्रुवारी २०२२ पहिले आणि तिसरे सत्र नवीन प्रवेशित विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा - १० ते १५ जानेवारी २०२२ ऑनलाइन लेखी परीक्षा - १८ जानेवारी ते नऊ फेब्रुवारी २०२२
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dyrhGa
Source https://ift.tt/310mqee
0 Response to "MSBTE डिप्लोमा परीक्षा ऑनलाइन स्वरूपात Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा