MU Convocation 2021: दोन लाखांवर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

MU Convocation 2021: दोन लाखांवर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

MU Convocation 2021: मुंबई विद्यापीठाचा वार्षिक विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत समारंभात समारंभपूर्वक पार पडला. दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. यंदा हा समारंभ करोनाकाळानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने पार पडला आहे. डॉ. श्रीनिवासन कन्नन यांना संस्कृत विषयात डिलीट पदवी तर डॉ. मुकुंद चोरघडे यांना रसायनशास्त्र विषयात डिएस्सी पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मुकुंद चोरघडे यांनी अमेरिकेतून ऑनलाईन पद्धतीने या दीक्षांत समारंभात सहभागी झाले. चोरघडे यांना डीएस्सी ही पदवी ऑनलाईन देण्यात आली. दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे गोव्यातील राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा.सुनील कुमार सिंह हे होते. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विविध विद्याशाखेतील २४३ स्नातकांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. यावर्षी पदवीधर झालेल्यांमध्ये १ लाख ९ हजार १७३ मुले तर १ लाख ३ हजार ४०६ मुलींचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ७९ हजार ७०६ तर पदव्युत्तरसाठी ३२ हजार ८७३ विद्यार्थी आहेत. तसेच मुलींमध्ये पदवी स्नातकांची संख्या ८३ हजार १५८ आणि पदव्यूत्तर स्नातकांसाठी २० हजार २४८ एवढी आहे. मुलांमध्ये पदवी स्नातकांची संख्या ९६ हजार ५४८ आणि पदव्यूत्तर स्नातकांसाठी १२ हजार ६२५ एवढी आहे. विद्याशाखानिहाय आकडेवारी लक्षात घेता यावर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये मानव्यविज्ञान शाखेसाठी २५ हजार ५९३, आंतरविद्याशाखेसाठी १० हजार ९८, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी १ लाख १७ हजार ८३२ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५९ हजार ५६ पदवींचा समावेश आहे. विविध विद्याशाखेतील २४३ स्नातकांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच डॉ. श्रीनिवासन कन्नन यांना संस्कृत विषयात डिलीट पदवी तर डॉ. मुकुंद चोरघडे यांना रसायनशास्त्र विषयात डिएस्सी पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १८ विद्यार्थ्यांना १९ पदके बहाल करण्यात येणार आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-annual-convocation-2020-21-over-2-lakhs-graduates-conferred-degrees/articleshow/88518912.cms

0 Response to "MU Convocation 2021: दोन लाखांवर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel