NCC कॅडेट्ससाठी वेगळी सेमिस्टर एक्झाम, यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश Rojgar News

NCC कॅडेट्ससाठी वेगळी सेमिस्टर एक्झाम, यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश Rojgar News

University Exams NCC Cadets : नॅशनल कॅडेट कोअरशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने कॅडेट्ससाठी स्वतंत्र सेमिस्टर परीक्षा घेण्याचे निर्देश (UGC) सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. एनसीसी कॅडेड नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान ट्रेनिंगमध्ये व्यस्त असतात. अशावेळी त्यांना सेमिस्टर देता येत नाही. या संदर्भात यूजीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाइट ugc.ac.in वर नोटिफिकेशन देखील जाहीर केले आहे. यामध्ये एनसीसी कॅडेट्ससाठी सेमिस्टर परीक्षा आयोजित करण्यासाठी नवीन तरतुदी नमूद करण्यात आहेत. 'प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी आणि प्रशिक्षणासाठी दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शिबिरे आयोजित केली जातात, असे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे. एनसीसीशी संबंधित कॅडेट्स आणि स्वयंसेवक यावेळी या शिबिरांमध्ये व्यस्त असतात. देशसेवेत योगदान देताना हे कॅडेट्स त्यांच्या सेमिस्टरच्या वर्गांना उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये या कॅडेट्ससाठी स्वतंत्र विशेष परीक्षा घेण्यात यावी.' जेणेकरून त्यांना त्यांचा अभ्यासही पूर्ण करता येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. या सेमिस्टर परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जाणार आहेत, त्यांना पुनर्चाचणी म्हटले जाणार नाही. या विशेष परीक्षा असतील असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व उच्च शैक्षणिक संस्थांनी या दिशेने योग्य पावले उचलावीत आणि एनसीसी कॅडेट्ससाठी स्वतंत्र सेमिस्टर परीक्षा घेण्याची तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून देशसेवेच्या कामाच्या बदल्यात या तरुणांना अभ्यासाचे नुकसान सहन करावे लागणार नाही असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) ही भारतीय लष्कराची युवा शाखा आहे. ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण देणे हा त्याचा उद्देश आहे. यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा समावेश आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pfPqXs
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "NCC कॅडेट्ससाठी वेगळी सेमिस्टर एक्झाम, यूजीसीचे विद्यापीठांना निर्देश Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel