Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-12-01T11:43:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET यूजी रिझल्ट आणि ओएमआर शीटमध्ये फेरफार झाल्याचा आरोप Rojgar News

Advertisement
NEET UG Result: राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा २०२१ बाबत सुरू असलेले वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. नीट पेपर लीक आणि कॉपी घोटाळा, भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका, नीट पीजी पात्रता निकष, नीट पीजी काऊन्सेलिंग पुढे ढकलल्यानंतर आता नीट परीक्षेचे आणखी एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे जारी केलेल्या नीटच्या अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे १ नोव्हेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. नीट निकाल आणि ओएमआर शीट स्कोअरिंगमध्ये अनेक विसंगती आहेत असा आरोप अंडरग्रेजुएट स्तरावर नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET UG-2021) साठी बसलेल्या सहा उमेदवारांनी केला आहे. नीट निकालातील तफावत प्रकरणाची सुनावणी १३ डिसेंबरला होणार आहे. या विद्यार्थ्यांनी सुनावणी आणि दिलासा मिळावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. एएस बोपण्णा आणि डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर १३ डिसेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या याचिकेवर खंडपीठाने संबंधित सर्व पक्षकारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीसही बजावली आहे. उत्तरतालिका आणि अंतिम निकालात फरक एनटीएने जारी केलेल्या नीट निकाल आणि ओएमआर शीट गुणांमध्ये मोठा फरक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. उत्तरतालिकेनुसार माझा स्कोअर ५८४ आहे पण NTA ने अंतिम निकालात १६४ गुण दाखवल्याचे एका याचिकाकर्त्याने सांगितले. दुसर्‍या याचिकाकर्त्याने उत्तरतालिकेआधारे गुण ६७५आणि अंतिम निकालात ५२ गुण असल्याचा दावा केला. आहे. त्याच वेळी, याचिकाकर्त्यांपैकी एकाला अंतिम निकालात शून्य गुण होते पण त्याच्या अंतिम उत्तर तालिकेत ५४५ गुण होते. नीट यूजी २०२१ ओएमआर शीट्सच्या स्क्रीनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी केल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिवक्ता रंजन कुमार सिंग यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. 'उत्तरतालिका प्रकाशित झाल्यानंतर लगेचच ओएमआर शीट्सच्या स्क्रीनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचे दिसून येते आणि परिणामी स्वयं-मूल्यांकनासाठी ओएमआर शीट्स अपलोड करण्यात आल्या आहेत असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान एनटीएतर्फे हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31iHYlM
Source https://ift.tt/310mqee