TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

NIFT Admission 2022: एनआयएफटी परीक्षेसाठी नोंदणी सुरु Rojgar News

NIFT Admission 2022: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी () परीक्षेच्या तारखेसह महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यानुसाह ६ फेब्रुवारी २०२२ रोजी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. यासाठी ३ डिसेंबर २०२१ पासून नोंदणी सुरू झाली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nift.ac.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. NIFT Admission 2022 विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारावर केला जाईल. यूजी, पीजी अभ्यासक्रमांसाठी १७ जानेवारी २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना विलंब शुल्क भरुन नोंदणी करावी लागणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेल्या प्रवेश मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवारांना फॉर्म सबमिट करताना त्यांची अर्ज फी देखील भरणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या तारखा आणि तिला अर्ज कसा करायचा याचा तपशील देण्यात आला आहे. NIFT Admission 2022: असा करा अर्ज उमेदवारांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अधिकृत वेबसाइट nift.ac.in वर जा. होमपेजवर 'शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी नोंदणी' लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. सर्व यूजी, पीजी अभ्यासक्रमांमधून पाहिजे तो अभ्यासक्रम निवडा. विचारल्याप्रमाणे सर्व तपशील देऊन अर्ज भरण्यास सुरुवात करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा. प्रवेश अर्ज सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भांसाठी एक प्रिंट डाउनलोड करुन प्रिंट करा. सामान्य आणि ओबीसी (नॉन-क्रिमी) श्रेणींमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवेश शुल्क ३ हजार रुपये आणि एससी/एसटी/पीडब्ल्युडी अंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी १,५०० रुपये शुल्क भरावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dm5PUD
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या