Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-12-09T12:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIFT मध्ये विविध पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी करा अर्ज Rojgar News

Advertisement
NIFT 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ( of Fashion Recruitments, NIFT) मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. एनआयएफटीतर्फे विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असून उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. भारत सरकारच्या (Indian Government) वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) ने देशभरातील विविध शहरांमध्ये असलेल्या १७ कॅम्पसमध्ये ही भरती केली जाणार आहे. याअंतर्गत १९० सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (क्रमांक ०७/सहाय्यक प्राध्यापक/कंत्राट/२०२१) १९० पदांपैकी ७७ अनारक्षित आहेत, तर ५३ ओबीसी, २७ एससी, १४ एसटी आणि १९ ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव आहेत. मधील सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या कराराचा कालावधी ५ वर्षांचा असेल आणि तो नंतर नियमित करता येईल. याप्रमाणे अर्ज करा सहाय्यक प्राध्यापक भरती २०२२ साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार संस्थेच्या अधिकृत वेबसाइट nift.ac.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांना प्रथम अर्जाच्या होमपेजवर नोंदणी करा. स्वत:च्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. यानंतर ऑनलाइन अर्ज भरुन सबमिट करा. भरलेला अर्ज डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा. NIFT सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बुधवार ८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करता येतील. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EIqkXM
Source https://ift.tt/310mqee