Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-06T11:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIOS ODE exam 2021: दहावी, बारावी परीक्षांच्या नोंदणीला आजपासून सुरुवात Rojgar News

Advertisement
NIOS ODE exam 2021: नॅशनल इंस्टिस्ट्यूट ऑफ स्कूलिंग (NIOS) ने शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी माध्यमिक म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी नोंदणी ६ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना एनआयओएसची अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर उपलब्ध जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. दहावी आणि बारावीच्या डिमांड परीक्षा ४ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार आहेत. ODE NIOS मुख्यालय आणि विशिष्ट केंद्रीय विद्यालयांमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा उमेदवारांना वाटप केलेल्या केंद्रांद्वारे दिल्या जाणार आहेत. एनआयओएसने सर्व प्रादेशिक संचालकांना केंद्राच्या वेबसाइटवर नोटिफिकेशन अपलोड करण्यास आणि स्थानिक दैनिकांमध्ये माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. १५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज एनआयओएसतर्फे विलंब शुल्कासह १५ मार्चपर्यंत नोंदणी करण्याची संधी देण्यात येईल. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांना विलंब शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागतील. १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणाऱ्यांना ४०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांकडून विलंब शुल्क म्हणून ७०० रुपये आकारले जाईल. उमेदवारांना घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. NIOS Admission 2022: असा करा अर्ज स्टेप १ : सर्वप्रथम NIOS च्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in ला भेट द्या. स्टेप २: होमपेजवर अर्ज सबमिशन करण्याची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा. स्टेप ३: अर्जाचा फॉर्म स्क्रीनवर खुला होईल. स्टेप ४: वैयक्तिक तपशीलांसह आवश्यक तपशील भरा. स्टेप ५: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. स्टेप ६: फीसह फॉर्म सबमिट करा. स्टेप ७: प्रवेश अर्ज सबमिट केल्यानंतर करा आणि प्रिंट घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31qEEFY
Source https://ift.tt/310mqee