Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-12-09T10:43:04Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NTSE 2022 जानेवारीत होणार प्रज्ञाशोध परीक्षा; नियोजनाला वेग Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE, Pune) पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची दिनांक जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या () नियोजनाला वेग आला आहे. १६ जानेवारी २०२२ रोजी परीक्षेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अतिविलंब शुल्क भरून १३ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अखेरीची संधी आहे. तर, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ही परीक्षा होणार असल्याने, विद्यार्थ्यांचे सराव वर्गही आता सुरू झाले आहेत. इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 'एनटीएस'करीता अर्ज करण्याची संधी आहे. त्यासाठी शाळानिहाय अर्ज प्रक्रिया सुरू आहे. १३ डिसेंबरपर्यंत अर्ज व शुल्क नोंदणी होईल. त्याची जबाबदारी पूर्णत: मुख्याध्यापकांवर असेल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. गतवर्षी महाराष्ट्र राज्यातून ७७४ विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीकरिता करण्याचा 'कोटा' निश्चित करण्यात आला होता. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना 'निगेटिव्ह मार्किंग' नसेल, असेही स्पष्ट केले आहे. तर, अवघ्या महिन्याभराने परीक्षा होणार असल्याने शाळांमध्ये सराव वर्गांना सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष वर्ग भरत असल्याने सराव करणे अधिक सोयीस्कर झाल्याचे विद्यार्थी सांगतात. तर, अतिरिक्त सरावासाठी ई-तासिकांचेही नियोजन काही शाळांनी केले आहे. दरम्यान, परीक्षेची गुणपडताळणी होणार नाही. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येते. त्यामुळे परीक्षेनंतर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध होईल. विद्यार्थी त्याद्वारे गुणांची तुलना करू शकतात. प्रथमस्तर परीक्षेचा निकाल मार्च २०२२ मध्ये जाहीर होईल. परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. प्रथमस्तर परीक्षा - १६ जानेवारी २०२२ द्वितीयस्तर परीक्षा - १२ जून २०२२ परीक्षेचे स्वरुप सकाळी १०.३० ते १२.२० या वेळेत बौद्धिक क्षमता चाचणी होईल. तर, दुपारी १.३० त ३.३० या वेळेत शालेय क्षमता चाचणी होईल. दोन्ही परीक्षेत १०० प्रश्न असतील. त्यासाठी प्रत्येकी एक गुण असेल. शिष्यवृत्तीचा तपशिल (दरमहा) शालांत परीक्षेनंतर ११-१२वी : १२५० रुपये पदवीपर्यंत : २ हजार रुपये पदव्युत्तर पदवीपर्यंत : २ हजार रुपये


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pAA8fY
Source https://ift.tt/310mqee