Advertisement

in India: करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या शाळा नुकत्याच वेगवेगळ्या राज्यांमध्ये उघडू लागल्या आहेत. दरम्यान करोना व्हायरसचा एक नवा स्ट्रेन ओमायक्रॉनने भारतात शिरकाव केला आहे. कर्नाटकमध्ये याचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविणाऱ्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बहुसंख्य पालकांना पुन्हा लॉकडाऊन होईल की नाही, शाळा बंद होतील की नाही याची चिंता आहे. असे असले तरीही शाळा बंद होण्याची आणि पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभुमीवर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सरकारला काही सूचना दिल्या आहेत. दीर्घकाळ शाळा बंद ठेवण्यापूर्वी सरकारने काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ओमायक्रॉनला जागतिक आरोग्य संघटनेने 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हणून घोषित केले आहे.कोरोना विषाणूच्या प्रकारामध्ये हा विषाणू टॉपच्या यादीत समाविष्ट आहे. गेल्यावर्षी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले. गेल्या वर्षी मार्चमध्ये देशभरातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. प्रदीर्घ बंदनंतर अनेक राज्यांनी विविध वर्गांसाठी अंशतः शाळा पुन्हा सुरू केल्या आहेत. भविष्यातील शिक्षण पद्धतीकडे वाटचाल करण्याची हीच वेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आपण शारीरिकदृष्ट्या वर्ग पुन्हा सुरू केले पाहिजेत. अत्यंत काळजीपूर्वक आणि शाळांमध्ये करोना निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या मेडिसीन विभागातील प्रोफेसर प्रज्ञा शर्मा यांनी सांगितले. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रोफेसर अरुण शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनची संसर्गक्षमता, संक्रमणक्षमता आणि विद्यमान रोगप्रतिकारक स्थितीशी त्याचा संबंध याबद्दल सध्या फारसे काही उपलब्ध नाही. त्यामुळे, आम्ही आता जे काही म्हणू ते अनुमान असेल. पण सरकार जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी अधिक नमुने गोळा करण्यासाठी, विमानतळ चाचणी लागू करण्यासाठी सर्व पावले उचलत असल्याचे ते म्हणाले. शाळा पुन्हा सुरू करणे किंवा बंद करणे हा कठीण निर्णय आहे. परंतु, मुलांना घरी ठेवल्यानेही त्यांना संसर्ग होणार नाही याचीही खात्री देता येणार नसल्याचे अरुण शर्मा म्हणाले. काळजीपूर्वक निरीक्षणाखाली शाळांमधील शारीरिक वर्ग पुन्हा सुरू केले जाऊ शकतात. सध्या दिल्लीत कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांची संख्या जास्त नाही. जर प्रकरणे वाढू लागली तर आपल्याला त्यानुसार वागावे लागेल असे एम्सचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ करण मदन यांनी सांगितले. सरकारसोबतच नागरिकांची जबाबदारीही आता वाढल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान, कार्यालयांममध्ये, सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंध नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ञ देत आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oidoSm
Source https://ift.tt/310mqee