TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Omicron Strain: आफ्रिकेतील विद्यार्थी विलगीकरणात Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद करोनाच्या आफ्रिकेमध्ये (South Africa) आढळलेल्या नव्या स्ट्रेनमुळे () जगाची चिंता वाढवली असल्याने आफ्रिकेमधून येणाऱ्या नागरिकांची देशभर कसून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, आग्नेय अफ्रिकेतील मलावीतील येथील एक विद्यार्थी (Student from Africa) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकताच दाखल झाला. विद्यापीठाने विद्यार्थ्याची केलेली करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. याउपरही खबरदारी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. करोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही आणि नव्या स्ट्रेनमुळे भीती निर्माण झाली आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली. असा स्ट्रेन आढळलेल्या देशातून आलेल्यांची तपासणी, विलगीकरण आदींची काळजी घेतली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षणासाठी विविध देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यात आग्नेय अफ्रिकेतील मलावी देशातील एक विद्यार्थी नुकताच आला असल्याचे सांगण्यात येते. मुंबईतून तो औरंगाबादमध्ये आला. विद्यार्थ्याची मुंबईतही तपासणी करण्यात आली त्यानंतर तो विद्यापीठात आला. 'फॉरेन स्टुडंट्स सेल'कडे माहिती आल्यानंतर सेलने विद्यार्थ्याची पुन्हा आरटी-पीसीआर करून घेतली. त्याची आरटी-पीसीआरचा अहवाल मंगळवारी सायंकाळी आला असून, अहवाल निगेटिव्ह आहे. असे असले, तरी खबरदारी म्हणून विद्यापीठाने विद्यापीठाला विदेशी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहातील स्वतंत्र रूममध्ये विलगीकरणात ठेवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत परकीय भाषा विभाग प्रमुख प्रा. विकास कुमार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली असून, विलगीकरणात विद्यार्थ्याला ठेवण्यात आले आहे. सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3obnvZk
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या