Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १४, २०२१ WIB
Last Updated 2021-12-14T06:48:49Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Advertisement

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत करिअर, नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. आरआरसीने लेव्हल ५/४, ३/२ साठी होणाऱ्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. १३ डिसेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया २७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

लेव्हल ५/४: जर तुम्हाला या लेव्हलसाठी अर्ज करायचा असेल, तर उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

लेव्हल ३/२ : या स्तरासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १२वी पास असावा. याशिवाय १०वी पास प्लस कोर्स असलेले देखील अर्ज करू शकतात.

( हे ही वाचा: India Post Recruitment 2021: भारतीय पोस्टमध्ये १२वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; पगार ८१ हजारापर्यंत! )

किती पदांसाठी होणार भरती?

रेल्वेच्या या भरतीअंतर्गत २१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये लेव्हल ५/४ ची ३ पदे रिक्त आहेत आणि लेव्हल ३/२ ची १८ पदे रिक्त आहेत. अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. १ जानेवारी २०२२ पासून वयाची गणना केली जाईल.

( हे ही वाचा: Indian Air Force Recruitment 2021: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील )

निवड प्रक्रिया काय आहे?

४० पैकी २५ किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे उमेदवारच पुढील टप्प्यातील मूल्यमापनासाठी पात्र असतील. अधिक तपशीलांसाठी अधिकृत सूचना पहा.

अर्ज फी किती?

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, PWD आणि महिलांसाठी अर्ज फी रु. २५० आहे.

( हे ही वाचा: BECIL Recruitment 2021: विविध पदांसाठी भरती; नोकरीची सुवर्ण संधी! जाणून घ्या संपूर्ण तपशील )

अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

The post Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्जाची प्रक्रियाhttps://ift.tt/3dmx3ZV