
School Education: शिक्षणाची ओढ असेल तर मार्ग सापडत जातात याचा अनुभव भाऊ-बहिणींना आला आहे. मध्य प्रदेशमधील दोन भाऊ बहिणींसाठी शाळा उघडली जाते. यासाठी मध्य प्रदेश सरकार वर्षाला दोघांसाठी ६ लाखपर्यंत खर्च करते. ही शाळा मध्य प्रदेशमधील नरसिंगपूर जिल्ह्यात आहे. दिपेश आणि मनिषा असे या भावा-बहिणींचे नाव आहे. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सरकारतर्फे यांचे शिक्षण पूर्ण केले जात आहे. एकीकडे सरकारी शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असताना दोन विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु ठेवण्याचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. नरसिंगपूरच्या गोटेगाव तालुक्यातील चिरचिटा गावातील सरकारी प्राथमिक शाळेची सध्या देशभरात चर्चा आहे. नरसिंगपूर जिल्ह्यातील या शाळेत दोनच मुले आहेत, तेही भाऊ-बहिण आहेत. या दोन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शाळेत दोन शिक्षक आहेत. या शाळेत मुले नसल्याने एका शिक्षकाला जवळच्या दुसऱ्या शाळेशी जोडण्यात आले आहे. तर इतर शिक्षक शाळेच्या वेळेत त्यांचे विद्यार्थी शोधून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. हे दोघे भाऊ बहीण विद्यार्थी शाळेत येतात तेव्हा शाळा सुरू होते. नाहीतर शाळेत एकटा वेळ घालवून शिक्षक घरी परत जातात. मात्र इयत्ता चौथीत शिकणारी मनिषा आणि इयत्ता पहिलीत शिकणारा तिचा भाऊ दिपेश हेच या शाळेत शिकत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी शासकीय यंत्रणा या शाळेवर दरवर्षी ६ लाखांहून अधिक खर्च करत आहे. मध्य प्रदेशच्या शालेय शिक्षण विभागाने ठरविले तर ही शाळा बंद करता येईल. पण कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये या भावनेतून प्रशासनाने ना ही शाळा बंद केली नाही अथवा शिक्षकांची बदली देखील केली नाही. सरकारी शाळांच्या योजना आणि शिक्षण प्रक्रीया पाहून पालक आपल्या पाल्यांसाठी खासगी शाळांचा पर्याय निवडत आहेत. मात्र जिल्ह्यात काही सरकारी शाळा अशाही आहेत जिथे मुलांची संख्या खूपच कमी आहे. जवळच्या खासगी शाळांमधून क्वचितच मुलं येथे आली आहेत. येथे शिकवणारे गुलाब साहू हे शिक्षक वयानेही शाळेसाठी फारसे काही करू शकत नाहीत. संपूर्ण शाळेची जबाबदारी सांभाळणे त्यांच्यासाठी कठीण आहे. पण दोन भावा-बहिणींना शिक्षण देण्यापासून ते मागे हटत नाहीत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dmagi1
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या