Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-12-09T12:43:46Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ लांबणीवर Rojgar News

Advertisement
Annual : मुंबई विद्यापीठाचा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. दीक्षांत समारंभाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे दीक्षांत समारंभ ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आला होता. यावर्षी मुंबईतील करोना केसे कमी झाल्यानंतर दीक्षांत समारंभ ऑफलाइन माध्यमातून होणार होता. या कार्यमक्रमात दोन वॅक्सिन झालेल्या विद्यार्थ्यांना आणि एक वॅक्सिन घेतलेल्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट असल्यास सहभागी होता येणार होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. १० डिसेंबरचा दीक्षांत समारंभ रद्द झाल्यानंतर पुढील तारखेची लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. जे विद्यार्थी २०२१ मधील प्रथम तसेच व्दितीय सत्रामध्ये त्यांच्या परीक्षेत दीक्षान्त समारंभाच्या दिवसापूर्वी उत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना दीक्षान्त समारंभानंतर पदवी / पदविका प्रमाणपत्रे त्यांच्या महाविद्यालयातुन वितरीत करण्यात येणार आहेत. यावर्षीच्या पदवी / पदविका प्रमाणपत्राची यादी लवकरच मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यातील आपले पदवी प्रमाणपत्र क्रमांक विद्यार्थ्यांनी शोधून आपल्या महाविद्यालयात सादर करावे म्हणजे महाविद्यालय आपणास आपले पदवी / पदविका प्रमाणपत्र वितरीत करेल असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. पदवी / पदविका प्रमाणपत्रे न मिळाल्यास किंवा त्यात काही त्रुटी आढळल्यास त्यासंबंधीची लेखी तक्रार दीक्षांत समारंभाच्या दिवसापासून एक महिन्याच्या आत विद्यानगरी येथील परीक्षा विभागात करावी असे प्रमाणपत्र विभागाचे उपकुलसचिव हिम्मत चौधरी यांनी सांगितले. २०२० चा मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समांरभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडला होता. या दीक्षांत समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ विद्यार्थ्यांना पदवी /पदविका प्रदान करण्यात आल्या. यावर्षी २ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पदवी प्राप्त केल्या जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ER5SDO
Source https://ift.tt/310mqee