TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

भारतीय सैन्य दलात भरती; पदवीधर उमेदवारांना संधी Rojgar News

भारतीय सैन्य दलाच्या टेक्निकल कोअर मध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याद्वारे जुलै २०२२ पासून सुरू होणाऱ्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC 135) साठी सोमवार, ६ डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सैन्यातर्फे आर्मी टीजीसी १३५ साठी जारी केलेल्या आर्मी टीजीसी १३५ नोटिफिकेशननुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार ४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आपला अर्ज सबमीट करू शकतील. भारतीय सैन्याद्वारे टेक्निकल कोअरमध्ये भरतीसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी टेक्निकल एन्ट्री स्कीम (TES)आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC)चे आयोजन केले जाते. टीईएस-46 साठी अर्ज प्रक्रिया ८ ऑक्टोबर २०२१ ते ८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवण्यात आली होती. आता टीजीसी १३५ साठी अर्ज प्रक्रिया सैन्याने सुरू केली आहे. अर्ज कसा करावा? जुलै २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या आर्मी टीजीसी १३५ साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याचे अधिकृत भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर जावे. तेथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना पोर्टल वर ऑफिसर्स एन्ट्री सेक्शनमध्ये आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग आपल्या क्रिडेन्शिअल्सच्या माध्यमातून लॉग इन करून उमेदवार आपला अर्ज सबमीट करू शकतील. आर्मी टीजीसी १३५ साठी पात्रता भारतीय सैन्याद्वारे यापूर्वी आयोजित केलेल्या टीजीसी भरती प्रक्रियांच्या नोटीसनुसार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून इंजिनीअरिंगची पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थीही अर्ज करण्यास पात्र आहेत, मात्र त्यांना १ जुलै २०२२ पर्यंत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल. त्यांना इंडियन मिलिट्री अकॅडमी (IMA) मध्ये कोर्स सुरू झाल्यापासून १२ आठवड्यांच्या आत सर्टिफिकेट सादर करावे लागेल. उमेदवारांची वयोमर्यादा १ जुलै २०२२ रोजी किमान २० ते कमाल २७ वर्षे असावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lEHBcO
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या