नागपुरातल्या पहिली ते सातवीच्या शाळा उघडण्यास १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती Rojgar News

नागपुरातल्या पहिली ते सातवीच्या शाळा उघडण्यास १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती Rojgar News

नागपूर महापालिका क्षेत्रातील शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास १५ डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०२१ नंतर करोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचे पुढील आदेश जारी करण्यात येतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, इयत्ता आठवी ते १२ वीचे वर्ग मात्र नियमित सुरू राहणार आहेत. यापूर्वी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार नागपुरातील शाळा १ डिसेंबर पासून सुरू होणार होत्या. मात्र, करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएन्टच्या जगभरातील प्रसाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाला १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली. याशिवाय शाळा उघडण्याबाबत तेथील स्थानिक प्राधिकरणांना अधिकार दिले. त्यानुसार नागपूर महापालिकेने आधी पहिली ते सातवीचे वर्ग १० डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तोही लांबणीवर टाकत आता १५ डिसेंबर रोजी कोविड स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार पुढील आदेश निर्गमित करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील पहिली ते सातवीच्या शाळा १३ डिसेंबरपासून नाशिक शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा खुल्या होण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, सोमवार (दि. १३ डिसेंबर)पासून सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या महापालिका आयुक्त आणि महापालिका शिक्षण विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार १ डिसेंबरपासून राज्यभरातील शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली असली, तरी स्थानिक परिस्थितीची पाहणी करून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आला होता. त्यानुसार नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या लसीकरणाचा, तसेच पालकांच्या सहमतीचा तपशीलही सादर करण्यात आला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mdpXgH
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "नागपुरातल्या पहिली ते सातवीच्या शाळा उघडण्यास १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel