एमकॉम, सीएसची परीक्षा एकाच दिवशी Rojgar News

एमकॉम, सीएसची परीक्षा एकाच दिवशी Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेच्या एमकॉम परीक्षेच्या कालावधीत सीए फाउंडेशनच्या परीक्षा असल्याने, विद्यापीठाने एमकॉमच्या परीक्षा २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता या कालावधीत 'सीएस'च्या परीक्षा होत असल्याने, दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला एमकॉमच्या परीक्षांचे पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर करावे लागण्याची शक्यता आहे. पुणे विद्यापीठाच्या दूरस्थच्या एमकॉम अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा ७ ते १० डिसेंबर दरम्यान घेण्याचे नियोजन होते. मात्र, याच कालावधीत 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंडिया'च्या (ICAI) वतीने ५ ते २० डिसेंबर दरम्यान 'सीए फाउंडेशन' परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी विद्यार्थीहित लक्षात घेऊन दूरशिक्षणच्या एमकॉम अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या परीक्षा २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, 'द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया'च्या (आयसीएसआय) वतीने एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्रॅमच्या परीक्षा २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षांमध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. 'सीएस'च्या परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होत असल्याने, त्यात बदल करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला दूरस्थच्या एमकॉम अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा एका पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31xd6OI
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "एमकॉम, सीएसची परीक्षा एकाच दिवशी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel