Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-12-03T16:43:04Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पुण्यातील पहिली ते चौथीची शाळा ६ डिसेंबरपासून सुरु Rojgar News

Advertisement
Reopen: पुणे ग्रामीण भागातील पहिली ते चौथीची शाळा ६ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुण्यासह राज्याातील पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. पण ओमायक्रॉनच्या भीतीने मुंबईतील शाळा १५ डिसेंबरनंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापाठोपाठ पुणे शहरातील शाळांबाबतही हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान आता पुण्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते चौथीची शाळा ६ डिसेंबरपासून सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने येत्या सोमवारी ६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी शुक्रवारी आदेश काढले असून, त्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची मान्यता आहे. त्यामुळे साधारण पावणेदोन वर्षानंतर शाळेतील चिमुकल्यांचा किलबिलाट पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. राज्य सरकारने करोना नियमावलीचे पालन करून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानुसार पुणे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या. त्यामुळे काही शिक्षक, तज्ज्ञ आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा सुरळीत आहेत. या परिस्थितीत पहिली ते चौथील्या शाळा सुरू करण्यात काय अडचण आहे, अशी विचारणा अभ्यासकांकडून होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते चौथीच्या शाळा सोमवारपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. गुंजाळ यांच्या आदेशावर आयुष प्रसाद आणि डॉ. राजेश देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने, शाळा सुरू होण्याबाबत कोणतीही अडचण येणार नाही. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या शाळा होत असल्यामुळे, सोमवारपासून पहिली ते बारावीच्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. मात्र, पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा १५ डिसेंबरपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अजूनही प्रतिक्षा करावी लागणार आहे, असेच चित्र आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GaTOOi
Source https://ift.tt/310mqee