
Student Hostels and : वारंवार मागणी करुनही पुण्यातील विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक शिष्यवृत्ती संदर्भात प्रश्न न सुटल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्टुडंट हेलपिंग हँड आणि छाञभारतीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार, मागील दोन वर्षां पासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती त्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच महाविद्यालये सुरू झालेली असली तरी अद्याप वसतिगृहे सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची गैरसोय होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्वाधर योजने लाभ मिळाला नाही. हा प्रश्न देखील स्टुडंट हेलपिंग हँड आणि छाञभारतीच्या विद्यार्थ्यांनी उचलून धरला आहे विद्यार्थ्यांनी यासंदर्भात तीव्र आंदोलन केले. तसेचआयुक्त प्रशांत नारनावरे यांची भेट घेतली. आयुक्त ननावरे यांनी विद्यार्थी संघटनांशी एक तास चर्चा केली. यानंतर विश्रांतवाडी येथील वसहतीगृहाची पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले. वसतीगृहे सोमवारी सुरु नाही झाली तर परत शिष्टमंडळास चर्चास बोलवले जाणार आहे. ज्या वसहतीगृहांची दुरावस्था झाली तेथील विद्यार्थ्यांना इतरत्र राहण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे आयुक्त ननावरे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलन करु असे स्टुंडट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DmQqOp
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या