Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-12-07T05:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दिल्या बनावट गुणपत्रिका Rojgar News

Advertisement
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : इतर राज्यातून मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील विद्यापीठ आणि शिक्षण मंडळाच्या बनावट गुणपत्रिकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला. या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून आणि त्या छापण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले. गुणपत्रिकांसोबत ही टोळी खासगी कंपन्यांमध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्रही देत असल्याचे उघड झाले. चेंबूरच्या वाशी नाका परिसरात राहणारे काही तरुण कोणतेही विद्यापीठ किंवा शिक्षण मंडळाच्या गुणपत्रिका तसेच शैक्षणिक आणि अनुभव प्रमाणपत्र देत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ९च्या पथकाला मिळाली. या गुणपत्रिका बनावट असल्याचे निदर्शनास आले. या माहितीची शहानिशा करण्यासाठी युनिट ९च्या पथकाने वाशी नाका परिसरातील घरामध्ये छापा टाकला. यावेळी वझुद्दीन अली खान आणि विकी कुमार शर्मा या दोघांना घरातून ताब्यात घेण्यात आले. दहा बनावट गुणपत्रिका, काही प्रमाणपत्र, प्रिंटर, हार्ड डिस्क तसेच इतर साहित्य खान याच्या घरामध्ये सापडले. शर्मा याच्या मदतीने खान हा मूळ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रावरील नावांमध्ये फेरफार करून त्याची विक्री करत होते. वझुद्दीन खान आणि विकी कुमार यांच्या टोळीमध्ये आणखी काही सदस्यांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून दोघांच्या चौकशीमध्ये अधिक माहिती समोर येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. दोन ते तीन हजारांत विक्री विकी कुमार हा महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या गरजूंना खानपर्यंत घेऊन येई. गरजेनुसार आणि ऐपतीनुसार हवे ते प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका बनवून दोन हजार ते तीन हजार रुपये त्या बदल्यात घेतले जात होते. या दोघांनी किती जणांना ही बनावट प्रमाणपत्र विकली, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lFMxOB
Source https://ift.tt/310mqee