Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-06T07:43:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

RRB NTPC CBT २ परीक्षेची तयारी कशी कराल? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स Rojgar News

Advertisement
CBT 2 Preparation : रेल्वे भरती बोर्डाने (,RRB) CBT- २ साठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा १४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. आरआरबी एनटीपीसी सीबीटी १ (RRB NTPC 1) परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार सीबीटी २ (CBT 2) परीक्षेत बसू शकणार आहेत. सीबीटी २ परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी बातमीत दिलेल्या महत्वाच्या टिप्स फॉले केल्यास त्यांना परीक्षा देताना फायदा होणार आहे. आरआरबी एनटीपीसी सीबीटीच्या परीक्षेत जनरल अवेअरनेस, मॅथेमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग या तीन विषयातून प्रश्न विचारले जातील परीक्षेत जनरल अवेअरनेसमधून ५० गुण, गणितातून ५० गुण आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगमधून ३५ गुणांचे प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत एकूण १२० गुणांचे प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना दीड तासांचा वेळ मिळणार आहे. परीक्षेच्या तयारीसाठी प्लानिंग आरआरबी एनटीपीसी सारख्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना खूप मेहनत घ्यावी लागते. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे स्वतंत्र प्लानिंग करणे गरजेचे आहे. या परीक्षेची तयारी करावी यासाठी उमेदवारांनी महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती आरआरबी एनटीपीसी सीबीटी २ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी संपूर्ण अभ्यासक्रम लक्षात घेऊन अभ्यासाचे वेळापत्रत तयार करावे. अभ्यासक्रमातील कोणताही भाग वगळू नये आणि सर्वांसाठी समान तयारी करायला हवी. मॉक टेस्ट आणि उजळणी परीक्षेचा अभ्यास करताना उमेदवारांनी सर्वप्रथम त्यांची क्षमता आणि कमकुवतपणाचे मूल्यांकन केले पाहिजे. हे जाणून घेऊन त्यानंतर विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट आणि मागील वर्षाच्या पेपरची उजळणी करणे आवश्यक आहे. सर्व विषयांसाठी समान तयारी आरआरबी एनटीपीसी सीबीटी २ परीक्षेत जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग, गणित आणि जनरल अवेअरनेस या तीन विषयांमधून प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांना या तिन्ही विषयांची समान तयारी करावी लागणार आहे. चांगली तयारी केल्यास जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगमध्ये अपेक्षित गुण मिळू शकतील. कमी वेळेत अधिक प्रश्न सोडवा गणिताच्या प्रश्नपत्रिकेत विचारले जाणारे प्रश्न हे दहावी आणि बारावीचे असतात. प्रॉफीट अॅण्ड लॉस, बेसिक अल्जेब्राची चांगल्या पद्धतीने तयारी करा. उमेदवारांनी कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. दररोज वर्तमानपत्र वाचा जनरल अवेअरनेसची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना जगभरातील चालू घडामोडी आणि घटनांची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज वर्तमानपत्र वाचणे गरजेचे आहे. यासाठी ऑनलाइन न्यूज पोर्टल देखील मदत करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DoMqgh
Source https://ift.tt/310mqee