Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-12-24T14:00:43Z
Rojgar

SBI Pharmacist Result 2021: एसबीआय फार्मासिस्ट परीक्षेचा निकाल जाहीर

Advertisement
स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India)फार्मासिस्ट पदांसाठी आयोजित केलेल्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट वर हा निकाल उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिला होती, ते आपला स्कोअर संकेतस्थळावर पाहू शकतात. या व्यतिरिक्त या वृत्तात दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून देखील निकाल पाहता येईल. SBI Result 2021: निकाल तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा फार्मासिस्ट भरती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा. आता करियर टॅबवर क्लिक करा. उमेदवारांना करंट ओपनिंग टॅबवर क्लिक करायचे आहे. 'RECRUITMENT OF PHARMACIST IN CLERICAL CADRE (Final Result Announced' पर्यायावर क्लिक करावे. आता एक नवे पीडीएफ उघडेल. पीडीएफमध्ये उमेदवारांना एसएसआर नंबर, अप्लाइड स्टेट, रीजन नंबर आणि रोल नंबर आदी माहितीसह निकाल उपलब्ध होईल. भविष्यातील संदर्भासाठी पीडीएफची एक प्रत सांभाळून ठेवावी. भारतीय स्टेट बँकेने लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निकाल जारी केला आहे. या दोन्ही परीक्षा COVID-19 महामारी निर्देशांसह आयोजित केल्या होत्या. फार्मासिस्टच्या पदासाठी लेखी परीक्षा १३ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. यानंतर एसबीआयद्वारे २४ आणि २५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मुलाखती घेतल्या होत्या. परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. मुलाखतीसाठी एकूण ५१९ उमेदवार उपस्थित होते. SBIने सेंट्रल रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट, मुंबई साठी अतिम निकाल जाहीर केला आहे. आंध्र प्रदेश, आसाम, दिल्ली, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि अन्य राज्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/sbi-pharmacist-result-2021-state-bank-of-india-sbi-has-released-the-result-for-pharmacist-post-on-sbi-co-in/articleshow/88475642.cms