SBI मध्ये २०५६ पदांची भरती, प्रवेशपत्र 'या' स्टेप्स फॉलो करुन करा डाऊनलोड

SBI मध्ये २०५६ पदांची भरती, प्रवेशपत्र 'या' स्टेप्स फॉलो करुन करा डाऊनलोड

SBI PO Mains 2021: स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल केल्यानंतर आता मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन मुख्य परीक्षा प्रवेशपत्र () डाउनलोड करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी अर्ज प्रक्रिया ५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदावर जाहीर झालेल्या या रिक्त पदासाठी पूर्व परीक्षेचा निकाल १४ डिसेंबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी मुख्य परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी घेतली जाऊ शकते. SBI PO साठी मुख्य परीक्षेत वस्तुनिष्ठ चाचणी आणि वर्णनात्मक चाचणी (एकाधिक निवड प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न) असे दोन भाग असतात. मुख्य परीक्षेसाठी २०० गुणांची परीक्षा असेल. ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. यासोबतच ५० गुणांचे वर्णनात्मक प्रश्नही विचारले जातील. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होणार आहेत. SBI PO Mains Admit Card 2021: असे करा डाऊनलोड प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- sbi.co.in ला भेट द्या. वेबसाईटच्या होमपेजवर, Current Recruitment वर क्लिक करा. आता SBI PO Mains साठी प्रवेश पत्राच्या लिंकवर क्लिक करा. येथे Admit Card Download या लिंकवर क्लिक करा. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरा. सबमिट केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या. रिक्त जागा तपशील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदासाठी एकूण २०५६ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये २००० जागा नियमित आणि ५६ जागा बॅकलॉगसाठी ठेवण्यात आल्या आहेत. नोटिफिकेशननुसार सामान्य श्रेणीसाठी ८१० जागा, ओबीसीसाठी ५४० जागा, EWS श्रेणीसाठी २०० जागा, एससी श्रेणीसाठी ३०० जागा आणि एसटी प्रवर्गासाठी १५० जागा नियमित ठेवण्यात आल्या आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/sbi-po-mains-admit-card-2021-state-bank-po-recruitment-mains-exam-admit-card-released-download-here/articleshow/88336420.cms

0 Response to "SBI मध्ये २०५६ पदांची भरती, प्रवेशपत्र 'या' स्टेप्स फॉलो करुन करा डाऊनलोड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel