Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २१, २०२१ WIB
Last Updated 2021-12-21T10:00:12Z
Rojgar

School Admission: शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान ठरले, जाणून घ्या

Advertisement
पुणे : राज्याच्या प्राथमिक संचालनालयाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी शाळेत जाण्यासाठी बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. यानुसार ३१ डिसेंबर २०२२ या दिवशी तीन वर्षे पूर्ण झालेला बालक प्ले-ग्रुप नर्सरी, चार वर्षे पूर्ण झालेला बालक ज्युनिअर केजी आणि पाच वर्षे पूर्ण झालेला बालक सिनिअर केजीसाठी पात्र ठरणार आहे. सहा वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश मिळू शकेल. शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित करण्यासाठी १८ सप्टेंबर २०२०च्या शासन निर्णयानुसार, ३१ डिसेंबर ‘डीम्ड डेट’ निश्‍चित करण्यात आली आहे. यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत जन्मलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत अडचणी निर्माण होऊ लागल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचे किमान वय जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सरकारने किमान वय जाहीर केले असले, तरी पूर्व प्राथमिकच्या प्रवेशांबद्दल पालकांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शाळांनी पूर्व प्राथमिकसाठी कमी-जास्त वयाचे कारण देऊन प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही, असेही संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इयत्ता आणि ३१ डिसेंबर २०२२पर्यंतचे किमान वय प्ले ग्रुप, नर्सरी- ३ वर्षे ज्युनिअर केजी- ४ वर्षे सिनिअर केजी ५- वर्षे पहिली - ६ वर्षे


source https://maharashtratimes.com/career/career-news/school-admission-find-out-the-minimum-number-of-students-for-school-admission/articleshow/88406520.cms