Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २० डिसेंबर, २०२१, डिसेंबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-12-20T12:00:59Z
Rojgar

SSC Exam 2022: दहावी परीक्षा अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

Advertisement
2022: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भात महत्वाची अपडेट जाहीर केली आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता नियमित शुल्कासह २६ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यापूर्वीची मुदत गुरुवार २० डिसेंबर २०२१ रोजी संपत होती. ही मुदतवाढ नियमित, खासगी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणारे आदी सर्वांना लागू राहील. याआधी उमेदवारांना १२ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत आणि विलंब शुल्कासह २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. पण एसएससी बोर्डाने याला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. अर्ज भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. नव्या सुधारित वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह २६ डिसेंबर २०२१ पर्यंत तर विलंब शुल्कासह २७ डिसेंबर ते १ जानेवारी २०२१ या कालावधीत दहावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. यानंतर ६ जानेवारी २०२२ पर्यंत शाळा चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरू शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२१ आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने असे आवाहन केले आहे की दहावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-exam-2022-re-extension-for-filling-up-of-10th-exam-application/articleshow/88389967.cms