Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-12-16T14:01:04Z
Rojgar

SSC HSC Exam Time Table : दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा ठरल्या, निकालाचा महिनाही सांगितला, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Advertisement
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी (SSC HSC Exam time table) इयत्तेच्या परीक्षांच्या वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड () यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत पार पडेल. तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पार पडेल. याशिवाय, बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत पार पडतील. तर दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत पार पडतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील. तसे परीक्षेचे स्वरुप आणि मूल्यमापनाची पद्धत पूर्वीप्रमाणेच असेल. परीक्षेदरम्यान शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. इ.१२ वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर, इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील. प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी, दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत पार पडेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल. निकाल कधी लागणार? इ.१२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील.


source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-10th-ssc-12th-hsc-exam-time-table-schudule-announce-by-education-minister-varsha-gaikwad/articleshow/88321212.cms