Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १५ डिसेंबर, २०२१, डिसेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-12-15T10:01:02Z
Rojgar

Tesla Recruitment: टेस्लामध्ये विविध पदांची भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Advertisement
2021: जगातील नामांकित कंपनी टेस्लामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यासाठी कंपनीतर्फे अर्ज प्रक्रियेचा तपशील देण्यात आला आहे. यासोबतच स्पेसएक्सची मालकी असलेल्या स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून २०२२ मध्ये भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू होणार असून भारतीयांना नोकरीची संधी मिळणार आहे. एलोन मस्क पुढील वर्षी भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणाच्या तयारीत आहेत. यासाठी कंपनीतर्फे सध्या नियामक मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. स्टारलिंकच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्याची प्री-बुकिंग ७,२०० रुपयांपासून सुरू झाली आहे. यामाध्यमातून स्टारलिंक भारतातील उमेदवारांना नोकऱ्या देत असल्याची माहिती स्टारलिंकचे भारतातील प्रमुख संजय भारद्वाज यांनी दिली. ग्रामीण भारतात होत असलेल्या परिवर्तनाला गती देण्यासाठी सॅटलाइट इंटरनेट सेवा सुरू करणे हा एक छोटासा उपक्रम आहे. आपण पुढे जाऊ तशा नोकरीच्या संधी खुल्या होतील असे संजय भारद्वाज यांनी कंपनीच्या लिंक्डइन पेजवर लिहीले आहे. कंपनीला परवाना मिळताच याला आणखी गती येईल आणि पात्र उमेदवार आपला बायोडाटा पाठवू शकतील असेही ते म्हणाले. स्टारलिंकमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कार्यकारी स्तरावर काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच त्याला कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान आणि मजबूत संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. उमेदवाराने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजिनिअर्सची भरती टेस्ला कंपनीतर्फ हार्डकोर एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंजिनिअर्स पदांच्या रिक्त जागांवर भरती केली जाणार असल्याचे इलॉन मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. टेस्ला कंपनीमध्ये फुल सेल्फ ड्रायव्हिंग चिप (FSD), डोजो सिस्टम, न्यूरल नेटवर्क, ऑटोनॉमी अल्गोरिदम आणि कोडिंगचा अनुभव असलेल्या इंजिनीअर्सची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना टेस्लाच्या बॉट प्रोजेक्टमध्ये काम करता येणार आहे. या पदभरतीचा सविस्तर तपशील टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/tesla-recruitment-various-post-vacant-in-tesla-know-application-process/articleshow/88292988.cms