Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-12-22T07:00:29Z
Rojgar

TET Exam Scam: माजी शिक्षण आयुक्त सुखदेव डेरे यांना मिळाली होती बढती

Advertisement
औरंगाबाद : शिक्षण उपसंचालक असताना पूर्वलक्ष्यी प्रभावाने, नियमबाह्य शिक्षकांच्या नेमणुका केल्याने एप्रिल २०१६मध्ये निलंबित करण्यात आलेले सुखदेव डेरे यांना काही महिन्यांतच बढतीचे पारितोषिक देण्यात आले होते. डेरे यांना प्रशासकीय, राजकीय अभय मिळाल्याने त्यांनी पेपरफोडीचे कुभांड रचल्याची चर्चा आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात सुखदेव डेरे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर डेरे पुन्हा चर्चेत आले आहे. शिक्षण उपसंचालक असताना त्यांनी दिलेल्या मान्यतेबाबत अनेक शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. तपासणीनंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय अध्यक्षपदी असताना डेरे यांचे निलंबन झाले होते. एप्रिल २०१६मध्ये डेरेंचे निलंबन झाल्यानंतर विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून निर्णयाचे स्वागत केले होते. परंतु, काही महिन्यांमध्ये पुन्हा डेरे शिक्षण विभागात रूजू झाले. त्यांना परीक्षा परिषदेवर बढती मिळाल्याने संघटनांनी नाराजीही व्यक्त केली होती. परीक्षा परिषदेच्या आयुक्त पदावर असताना त्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळे पुन्हा डेरे चर्चेत आले. विभागीय अध्यक्षपदावर असतानाही त्यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी संघटनांनी केल्या होत्या. डेरे शिक्षण उपसंचालक म्हणून औरंगाबाद येथे चार डिसेंबर २०१२ रोजी रूजू झाले व १७ जानेवारी २०१४ रोजी त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. डेरे यांनी उपसंचालक असताना दिलेल्या मान्यतांची चौकशी करून, या मान्यता रद्द करण्यात याव्यात अशी मागणी पुढे येत आहे. अशा होत्या तक्रारी.. दोन वर्षे उपसंचालक पदावर कार्यरत असताना डेरे यांनी २५पेक्षा अधिक संस्थांमध्ये अनेक शिक्षकांना नियमबाह्य नियुक्ती दिल्याच्या तक्रारी होत्या. पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता त्यांनी दिल्याचे तक्रारीत होते. नियुक्ती देताना आरक्षण डावलून, नियमबाह्य शिक्षकांना मान्यता, चुकीच्या संचमान्यता, शिक्षक, चालकभरती केल्याचा आरोप होता. ‘जोशाबा’ संघटनेचे डॉ. संजय शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर डी. बी. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीने संबंधित संस्थांच्या संचिका मागवून घेऊन, तपासणी केली होती. त्यानंतर अहवाल सादर करण्यात आला. तत्कालीन शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तर भापकर यांच्या कार्यकाळात डेरे यांचे निलंबन करण्यात आले होते. डेरे यांनी औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक असताना अनेक शिक्षकांना नियमबाह्य मान्यता दिल्या होत्या. म्हणून जोशाब शिक्षक कर्मचारी महासंघातर्फे शासनाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन शासनाने चौकशी समिती नेमली चौकशीत दोषी आढळल्याने डेरे यांना निलंबित केले होते; परंतु डेरे यांनी पुन्हा गैर मार्गाचा अवलंब करून नियुक्ती मिळवली आणि पुन्हा टीईटी परीक्षेत भ्रष्टाचार केल्याची प्रतिक्रिया जोशाबा शिक्षक कर्मचारी महासंघाचे डॉ. संजय शिंदे यांनी दिली.


source https://maharashtratimes.com/career/career-news/tet-exam-scam-former-commissioner-sukhdev-dere-was-promoted/articleshow/88424084.cms