Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-12-23T07:00:28Z
Rojgar

TET Exam Scam: यंदाची 'टीईटी' ही वादात, परीक्षेतील गैरव्यवहारांचा तपास सुरु

Advertisement
: दोन महिन्यांपूर्वी झालेली शिक्षक पात्रता परीक्षाही (TET Exam) वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या ‘विनर सॉफ्टवेअर’ कंपनीशी (Winer Software Company)संबंधित सौरभ त्रिपाठी याला लखनौ येथून पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. परीक्षेतील गैरव्यवहारांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. ‘टीईटी-२०२१’ची जबाबदारी ‘विनर सॉफ्टवेअर’ कंपनीकडे होती. कंपनीशी संबंधित सौरभ महेश त्रिपाठी (वय ३९, रा. बेलमोरक इस्टेट, बाणेर, मूळ, गाझियाबाद) याला लखनौ येथून पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. म्हाडा आणि टीईटी परीक्षेतील घोटाळ्याशी संबंधित आरोपींच्या चौकशीमध्ये त्रिपाठीचे नाव समोर आले होते. या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे दिसल्यानंतर त्याला मंगळवारी लखनौ येथून ताब्यात घेण्यात आले आणि बुधवारी अटक करण्यात आली. सौरभ त्रिपाठीला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी दिला. या वेळी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी करताना ‘टीईटी’ परीक्षेत अपात्र ठरलेल्या ५५० ते ६०० विद्यार्थ्यांची यादी त्रिपाठीने अन्य साथीदारांच्या मदतीने तयार केली होती आणि त्यासाठी पैशांची मोठी देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला. म्हाडा पेपरफुटीचा तपास करताना टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहाराची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर याना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात २०१८मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. या परीक्षेची जबाबदारी मुख्य आरोपी व जी. ए. सॉफ्टवेरचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख याच्याकडे होती. त्याच्यासह तत्कालीन संचालक अश्विनकुमार, तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांनी संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे. या आरोपींकडे केलेल्या चौकशीत सौरभ त्रिपाठीचे नाव समोर आले.


source https://maharashtratimes.com/career/career-news/tet-exam-scam-teacher-eligibility-test-held-two-months-ago-is-also-in-the-midst-of-controversy/articleshow/88446647.cms