UBI Recruitment 2021: युनियन बँकेत भरती; आजच करा अर्ज

UBI Recruitment 2021: युनियन बँकेत भरती; आजच करा अर्ज

Bank Job 2021: बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑफ इंडिया म्हणजेच यूबीआयने ( of India,UBI Recruitment 2021 notification) विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यूबीआयद्वारे डिजिटल टीम, (Digital Team) अॅनालिटिक्स टीम (Analytics Team), इकॉनॉमिस्ट टीम (Economist Team), रिसर्च टीम (Research Team), एपीआय मॅनेजमेंट टीम (API Management Team) आणि डिजिटल लँडिंग अँड फिनटेक टीम (Digital Lending & Fintech team) साठी विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार अर्ज करू इच्छितात ते अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यूबीआयद्वारे जारी नोटिफिकेशननुसार एकूण २५ पदांवर ही भरती होणार आहे. अर्ज प्रक्रिया १८ डिसेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ जानेवारी २०२२ आहे. UBI Recruitment 2021: अॅनालिटिक्स टीम सह अन्य पदांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज अॅनालिटिक्स टीम, इकॉनॉमिस्ट टीम सहित पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट- Unionbankofindia.co.in वर जा. यानंतर रिक्रूटमेंट टॅब वर क्लिक करा आणि करंट रिक्रूटमेंट टॅब वर जा. आता 'युनियन बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी / डोमेन विशेष तज्ज्ञांची भरती' ही अधिसूचना दिसेल. आता 'अप्लाय ऑनलाइन' टॅब वर क्लिक करायचे आहे. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की त्यांना आपले नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडीसह नोंदणी करायची आहे आणि पदाचे नाव लिहायचे आहे. यानंतर उमेदवारांना अर्ज भरायचा आहे. अर्जासाठी उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल. उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे की भविष्यातील संदर्भासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहा.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ubi-recruitment-2021-vacancy-for-the-post-of-senior-and-digital-manager-in-union-bank/articleshow/88535769.cms

0 Response to "UBI Recruitment 2021: युनियन बँकेत भरती; आजच करा अर्ज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel