TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

केंद्रीय विद्यापीठांमधील UG, PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी अनिवार्य: UGC Rojgar News

UGC Guidelines 2022-23: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील केंद्रीय अनुदान प्राप्त विद्यापीठांमध्ये (Central universities) रिसर्च (PHd),पदवी पूर्व आणि पदव्युत्तर (Under Graduate-Post GRaduate)अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी मोठे बदल केले आहेत. आयोगाने पीएचडी (PHd) प्रवेशांसाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट (, ) परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. याशिवाय या केंद्रीय सहाय्यता प्राप्त उच्च शिक्षण संस्थांमधील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET देऊन पात्र होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यूजी, पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसंबंधीचे हे नवे नियम पुढील शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून लागू होणार आहेत. केंद्रीय विद्यापीठांसाठी केंद्रीय पात्रता परीक्षा किंवा सीईटी राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) द्वारे किमान १३ भाषांमध्ये आयोजित केली जाईल. प्रवेशासाठी सीईटी स्कोर वर विचार करण्यासाठी खासगी आणि स्वायत्त विद्यापीठांनादेखील यूजीसीने शिफारस केली आहे. केंद्रीय विद्यापीठांसाठी सीईटी याच वर्षीपासून सुरू होणार होती, पण करोना संक्रमणामुळे या सीईटीच्या आयोजनाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. यूजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. यात असे म्हटलेय की, 'सर्व केंद्रीय विद्यापीठांना शैक्षणिक सत्र २०२२-२०२३ पासून कॉमन एन्ट्रन्स टेस्टसाठी योग्य ती तयारी, उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जात आहे. या परीक्षा किमान १३ भाषांमध्ये आयोजित केल्या जातील. एनटीए यापूर्वीच जेईई आणि नीट परीक्षा आयोजित करत आहे. राज्य / खासगी विद्यापीठे / डीम्ड यूनिव्हर्सिटीज खील कॉमन एन्ट्रन्स टेस्ट आपल्या प्रवेशांसाठी लागू करू शकतात. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात (NEP 2020) नुसार हे प्रस्तावित करण्यात आले आहे.' नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात (NEP 2020) देशातील सर्व विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी एकाच सामायिक केंद्रीय प्रवेश परीक्षेचा प्रस्ताव ठेवला होता. यामुळे बोर्डांवरील अवलंबिता कमी झाली. सीईटीमुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सामायिक व्यासपीठ तयार होण्याची अपेक्षा आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून ही सीईटी लागू होण्याची शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31bGDOi
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या