Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ८ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-12-08T14:43:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UGC ने जारी केली ऑनलाइन कोर्स शिकवणाऱ्या संस्थांची यादी Rojgar News

Advertisement
विद्यापीठ अनुदान आयोगाने अशा उच्च शैक्षणिक संस्थांची (HEI) यादी जारी केली आहे, ज्या संस्था २०२१-२२ साठी ऑनलाइन कोर्सेस ऑफर करणार आहेत. विद्यापीठांची यादी यूजीसीच्या ऑफिशियल वेबसाइट .ac.in वर जाऊन पाहता येईल. आयोगाने प्राप्त अर्जांच्या आधारे पात्र उच्च शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली आहे. नियामक प्राधिकरणांच्या कक्षेत येणाऱ्या अभ्यासक्रमांशी संबंधित नियामक प्राधिकरणद्वारे प्राप्त शिफारशींच्या आधारे विचार केला गेला आहे. दोन विद्यापीठांचा - मानव रचना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड स्टडीज, फरीदाबाद (डीम्ड यूनिवर्सिटी) आणि जीएलए यूनिवर्सिटी, मथुरा (खासगी विद्यापीठ) शैक्षणिक सत्रासाठी ओपन आणि डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम आणि ऑनलाइन प्रोग्रामसाठी यादीत समावेश करण्यात आला आहे. २०२१-२२ साठी दोन्ही संस्था ग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट कोर्स ऑफर करतील. शैक्षणिक सत्रासाठी प्रवेशाची अखेरची मुदत आयोगाद्वारे कळवण्यात येईल आणि शैक्षणिक संस्था त्याद्वारे १५ दिवसांच्या आत प्रवेशांचा तपशील अपलोड करू शकतील. शैक्षणिक सत्र नोव्हेंबर २०२१ साठी अॅडमिशनची अखेरची तारीख १५ डिसेंबर २०२१ आहे. शैक्षणिक सत्र नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२६ पर्यंत असेल. येथे स्थगित झाली नेट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA)ने यूजीसी नेट २०२१ परीक्षा स्थगित करण्यासंबंधी आवश्यक नोटीस जारी करण्यात आली आहे. एनटीएने ओडिशा आणि आंध्र प्रदेश क्षेत्रातील परीक्षा (UGC NET 2021) लांबणीवर टाकल्या आहेत. यूजीसी नेट २०२० (UGC-NET 2020) आणि जून २०२१ परीक्षा पुरी, भुवनेश्वर, कटक, विशाखापट्टणममधील बेरहामपूर आणि आंध्र प्रदेशातील गंजम जिल्हे आणि ओडिशातील रायगड जिल्ह्यातील गुणुपूर या केंद्रांसाठी पुन्हा घेतल्या जाणार आहेत. जवाद चक्रीवादळामुळे (Cyclone Jawad) ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील काही भाग प्रभावित झाला आहे. म्हणून या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवरील - राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (IIFT) च्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GqEYDe
Source https://ift.tt/310mqee