Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-12-27T12:00:18Z
Rojgar

UPSC Recruitment 2021: यूपीएससीत विविध प्रकारच्या १८७ पदांवर भरती

Advertisement
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने ()नोटिफिकेशन जारी केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने असिस्टंट इंजिनीयर (Assistant Engineer), असिस्टंट कमिशनर क्वालिटी इंश्युरन्स (Assistant Commissioner Quality Assurance) असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) ज्युनियर टाइम स्केल (Junior Time Scale, JTS) सहित अन्य पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. याअंतर्गत एकूण १८७ पदे भरली जाणार आहेत. जे इच्छुक उमेदवार अर्ज करू इच्छितात ते ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची मुदत १३ जानेवारी २०२२ आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करताना उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल. मात्र, अनुसूचित जाति, अनुसूचित जमाति, पीडब्ल्यूबीडी, महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे ही त्यांना जन्मतारीख, स्वाक्षरीची इमेज, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रे जमा करावी लागतील. उमेदवारांना असा सल्ला देण्यात येतो की अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सोबतच भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रिंट आपल्याकडे सुरक्षित ठेवावी. या पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत मुलाखतीचा राऊंडदेखील होणार आहे. मुलाखतीदरम्यान उमेदवारांना CoVID-19 आणि ओमिक्रॉनसंबंधी दिशानिर्देशांचे पालन करायचे आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-recruitment-2021-upsc-has-released-vacancy-for-posts-of-assistant-engineer-and-assistant-professor-apply-at-upsc-gov-in/articleshow/88523106.cms